शेती विशेष

पिकविमा काढण्याची मुदत शासनाने वाढवावी-कृषीभूषण अनिल पाटिल

पालघर (सचिन भोईर) :-

पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत असलेल्या पिक विम्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन शेतकऱ्यांना शासनामार्फत केले जाते.शेतकरी देखील आपल्या शेतीच्या सुरक्षितेसाठी या योजनेमधे सामिल होण्याचा प्रयत्न करतो.मात्र मागील 5 ते 6 दिवसांपासून सदर पिक विमा योजनेचे सर्वर काम करत नसल्याने पिक विमा योजनेचे ऑनलइन अर्ज भरण्यासाठीचे काम ठप्प झाले असून त्यामुळे शेतकरयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याआधी वेबसाइड चालु असताना तिला गती नसल्याने ही कामे संथ गतीने चालू होती. त्यामुळे ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळात थांबावे लागत होते.
या सर्व गैरसोयीमूळे शेतकरी हैरान झाले असून पिक विम्याची मुदत संपत असताना हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहन्याचा धोका आहे. त्यामुळे या पिक विमा योजनीची वेळ वाढऊन द्यावी तसेच बँकाना ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याच्या सुचना दयाव्यात, अशी मागणी वसंतराव नाईक राज्यस्तरीय कृषि पुरस्कार विजेते शेतकरी अनिल पाटिल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.