अरुण गवळी”दगडी चाळ

अरुण गवळी”दगडी चाळ

image

अरूण गुलाब गवळी
जन्मतारीख:15जुलै1952: :
उंची :पाच फूट -तीन इंच
वजन:54किलो,
शिक्षण-अकरावी पास
व्यवसाय:गुन्हेगार
पत्ता:दगडीचाळ,भायखळा:
मुंबई पोलिसांकडे असलेली ही अरूण गवळीची उर्फ
डॅडीची माहिती. अर्थात ,पोलिसांकडे
गवळीची तपशीलवार कुंडलीच आहे.सर्वसामान्य
नागरिकांना त्यापेक्षाही गवळीच्या कितीतरी सुरस
कहाण्या माहिती आहेत.गवळी म्हणजे मूर्तीमंत क्रौर्यच
अशी अंडरवर्ल्डमध्ये ख्याती आहे. मुंबापुरीवर राज्य
करण्यासाठी ऐंशी व नव्वदच्या दशकामध्ये दाऊद
इब्राहिम,अमर नाईक आणि अरूण
गवळी यांच्या टोळ्यांमध्ये उडालेल्या रक्तरंजीत
संघर्षात शेकडो बळी गेले. दररोज
दिवसाढवळ्या मुंबापुरीत रक्ताचे पाट वाहत होते.
त्याकाळात गवळी गुन्हेगारी क्षेत्रातील अत्युच्च
स्थानावर होता. त्याची ती ओळख
तो आजतागायात पुसू शकलेला नाही.
मध्यंतरी स्वत:चा पक्ष काढून
तो आमदारही झाला आणि पोलिसांच्या लेखी गुन्हेगार
असलेल्या या डॉनला सॅल्यूट
ठोकण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली.
मधल्या काळात गवळी विजनवासात होता.
तरीही तो लोकांच्या विस्मरणात गेला नव्हता.
त्याची गुन्हेगारी ताकद कमी झाली किंवा कसे
याबाबत मते,मतांतरे असतीलही. पण, नागरिकांच्यादृष
्टीने गवळी अर्थात डॅडी आजही डॉन आहे. अरूण गवळी हे
नाव नुसते उच्चारले तरी कित्येकजण चळाचळा कापतात
ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर
जमसंडीकर यांच्या हत्येप्रकरणी गवळी गेल्या पाच
वर्षांपासून कारागृहात आहे. तब्बल तीन दशके संघटीत
गुन्हेगारीच्या मूळ प्रवाहात
असलेल्या आणि पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल
केलेल्या गवळीविरुद्ध सिद्ध झालेला हा पहिलाच
गुन्हा आहे. दाऊद इब्राहिमचा मेव्हणा इब्राहिम
पारकर याची हत्या, आमदार रमेश मोरे यांचा खून,
पूर्वाश्रमीचा गँगस्टर अश्विन नाईकवर
झालेला खुनी हल्ला, दाऊदचा ब्रेन सतीश राजे
याची बुलेटप्रूफ मोटार फोडून झालेला खून
अशा गेल्या तीन दशकातील कितीतरी प्रकरणांमध्ये
गवळीचे नाव गोवले गेले. कधी त्याच्याविरुद्ध
गुन्हा दाखल झाला. कधी ते शक्य झाले नाही.
दहशतवाद व अतिरेकी कारवाया प्रतिबंधक
कायदा(टाडा)23मे1985 ला महाराष्ट्रात लागू
झाला आणि त्या कायद्याखाली गवळीला पाच
वर्षे तुरुंगाची हवा खायला लागली. पण,’टाडा’
तूनही त्याची निर्दोष
मुक्तता झाली आणि दगडी चाळीतील डॅडी शोध-
प्रतिशोधाचे नाट्य खेळण्यास सज्ज झाला.
गवळी विरुद्ध थेट हल्ल्याचा गुन्हा कधीच दाखल
झाला नव्हता.गुन्ह्यांचा कट
रचल्याचा गुन्हा (कलम120ब)त्याच्याविरुद्ध
नोंदविला गेला.
कोणत्याही फौजदारी खटल्याच्या सुनावणीत
आरोपीविरुद्ध हे कलम सिद्ध करणे महाकठीण असते.
त्यामुळेच या कलमान्वये गुन्हा शाबीत
झाल्याची उदाहरणे फारच मोजकी आहेत. नगरसेवक
जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणीही मारेकरी निराळेच
आहेत. या गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप गवळीवर
ठेवण्यात आला. पोलिसांचा नेमका तपास, पुरावे
आणि सरकारी वकीलांच्या कौशल्यपूर्ण
युक्तिवादाने तो सिद्धही झाला. त्यामुळे
कधीही गुन्ह्याच्या जाळ्यात न
अडकलेला गवळी या गुन्ह्यात दोषी ठरला.
80च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते
90च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत मुंबईतील
परीस्थिती अत्यंत जीवघेणी होती. या शहरावर
राज्य करण्यासाठी दाऊद,नाईक
आणि गवळी यांच्या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये कमालीचे
धमासान सुरू होते. एकाहून एक खतरनाक गुंड, त्यांचे
पोशिंदे उद्योगपती परस्परांच्या दुष्मनीतून मारले जात
होते. या रक्तरंजीत संघर्षात कितीतरी गुन्हेगार आले
आणि गेले; पण सर्वाधिक स्मरणात राहिला तो अरूण
गवळी. 1987च्या सुमारास
पोलिसांचा ससेमीरा मागे लागल्यावर छोटा राजन
आणि अन्य निकटच्या साथीदारांसह दाऊदने सुरक्षित
दुबई गाठली. अमर नाईकही विदेशात भूमिगत झाला.
एकटा गवळी दगडी चाळीत राहून
प्रतिस्पर्धी टोळ्यांशी दोन हात करीत होता.
विशेष म्हणजे दगडी चाळीच्या भुलभुलैय्यातून
त्याला शोधणे प्रतिस्पर्ध्यां
ना आणि पोलिसांनाही महाकठीण होते.
आपल्याला वाचायचे असेल, तर समोरच्याला संपवले
पाहीजे या तंत्राचा अवलंब करीत प्रतिस्पर्ध्यां
चा खात्मा तो करू लागला. त्याचबरोबर
आपल्या साथीदारांच्या खुनांचा दाहक
बदला घ्यायलाही तो चुकत नव्हता. त्यामुळेच
अंडरवर्ल्डमध्ये त्याच्या नावाची भयानक दहशत
निर्माण झाली. या दहशतीचा पुरेपूर वापर करीत
तो कोट्यवधींच्या खंडण्या उकळत होता. मुंबईत
टोळीयुद्ध शीगेला पोचल्यावर प्रदीपशर्मा,
विजयसाळसकर, प्रफुल्लभोसले, दया नायक
यांच्यासारख्या जिगरबाज अधिका-
यांनी अंडरवर्ल्डचा बीमोड केला.
पोलिसांच्या चकमकीत सातशेहून अधिक गुंड ठार झाले.
टोळीयुद्धातही जवळपास तितक्याच गुंडांचे बळी गेले.
मुंबईवरील वर्चस्वासाठी झुंजणा-या टोळ्यांचे सरदार
दाऊद इब्राहिम व छोटा राजन विदेशात स्थायिक
झाले होते. अमर नाईक पोलीस चकमकीत मारला गेला.
अश्विनने गुन्हेगारी क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. मुंबईत
शिल्लक राहीलेला एकमेव डॉन अर्थात अरूण
गवळीनेही आपला पवित्रा बदलला. दगडी चाळीत बसून
तो राजकारण करू लागला. अंडरवर्ल्डमधील अन्य
बड्या गुन्हेगारांमध्ये आणि गवळीमध्ये एक ठळक फरक
आहे .तो म्हणजे गवळीचे विदेशातील गुंडांशी संबंध
असल्याचे आतापर्यंत तरी निदर्शनास आलेले नाही.
या उलट दाऊद, छोटा राजन, अमर नाईक, गुरू साटम
आदींचे जगभरातील गुन्हेगारांशी त्यांचे लागेबांधे आहेत.
गवळी मुळात या गुन्हेगारीकडे वळाला तरी कसा?
भायखळ्याचा हा तरूण गोदरेज कंपनीत
नोकरीला होता. अशोक चौधरी, सुनिल घाटे,
चंद्रशेखर मिराशी, सदामामा पावले, विजय तांडेल,
दिलीप कुलकर्णी, गणेश भोसले हा गवळीचा ग्रुप.
भायखळ्यात वजन
असलेल्या रमा नाईकशी त्याची सलगी होती. त्याच
भागात पारसनाथ पांडे, कुंदन दुबे यांचे दारूचे अड्डे होते.
पारसनाथ आणि रमाची त्यावेळी टसल चालत असे.
कुंदन दुबेने आपले पोलीस खात्यातील कॉन्टॅक्ट वापरून
रमाला ‘मिसा’ मध्ये कैद केले. साधारणत: 1980
च्या सुमारची ही घटना. कुंदनची बहिण
पुष्पा आणि रमाचा भाऊ अरविंद यांचे प्रेमसंबंध होते.
त्यातून पारस आणि कुंदनने अरविंदला उडवले.
त्याचा बदला म्हणून रमाच्या टोळीने सेंट्रल
मुंबईच्या पुलावर पारसला उडवले. त्यापाठोपाठ
कुंदनचाही बळी गेला. त्यापैकी एका प्रकरणात
रमाबरोबर गवळीचे नाव गोवले गेले आणि तेथूनच
त्याच्या गुन्हेगारी कारकिर्दीची सुरूवात झाली.
त्या काळात दाऊद, बाबू रेशीम, छोटा राजन
आणि रमाभाई यांची मुंबईत बलाढ्य ताकद होती.
छोटा राजन, भाई ठाकूर आणि शरद शेट्टी हे
रमाला कायम सापत्न वागणूक देत. त्यातच
रमा आणि शरद शेट्टीत
झालेल्या एका भूखंडाच्या वादात दाऊदने शरद
शेट्टीच्या बाजूने कौल
दिला आणि संतापलेला रमा नाईक या टोळीतून
बाहेर पडला. भायखळा, लालबाग, परळ, ताडदेव
भागातील साथीदारांसह रमाभाईने स्वतंत्र
टोळी तयार केली. त्याचा त्या परिसरात जबरदस्त
दरारा होता. पण, त्याचा हा प्रभाव फार काळ
टिकला नाही. चेंबूर परिसरात
21जुलै1988ला पोलिसांशी झालेल्या चकमकीत
रमा ठार झाला आणि अरूण
गवळी या टोळीचा नवा सरदार बनला.
रमाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी गवळी टोळी टपून
होती. सतीश राजे ही वजनदार असामी दाऊदचा ब्रेन
मानली जात होती. 21नोव्हेंबर1988 ला राजे
विदेशी बनावटीच्या बुलेटप्रूफ गाडीतून
चालला होता. सिग्नलला गाडी थांबताच
गवळीच्या पोरांनी भल्या मोठ्या हातोड्याने
गाडीच्या काचा फोडून पिस्तुलातून बेधुंद गोळीबार
करीत राजेला ठार केले. या घटनेचे वृत्त समजताच मुंबईत
एकच सन्नाटा पसरला. सा-या अंडरवर्ल्डने
गवळीच्या धाडसाला दाद दिली. तेव्हापासून सुरू
झालेला रक्तरंजित संघर्ष अनेक वळणे घेत अखेर 2000
च्या सुमारास थंडावला. सख्खा भाऊ
पापा गवळी याच्यापासून ते किरण वालावलकर,
छोटाबाबू, सदामामा पावले, चंद्रशेखर मिराशी,
तान्या कोळी, पॉल पॅट्रीक, दिलीप कुलकर्णी,
अशोक जोशी असे एकाहून एक सरस आणि निकटचे बहुतेक
साथीदार गवळीला गमवावे लागले. दररोज
एका साथीदाराच्या मृत्यूची वार्ता यायची. पण
डॉन अविचल होता. चाळीच्या नावाप्रमाणेच त्याचे
मन घट्ट दगडासारखे झाले होते. नवनवे साथीदार
गोळा करीत त्याने लढा सुरूच ठेवला होता.
त्या संघर्षात त्यानेही अनेकांना कंठस्नान घातले.
कोट्यवधींच्या खंडण्या उकळल्या. उद्योगपतींमध्ये
दहशत निर्माण केली. मराठी माणसांमध्ये
आपल्या नावाचा ठसा निर्माण केला.
त्याच्याविषयी अनेकांना आकर्षण निर्माण झाले.
गवळी आणि त्याची दगडी चाळ
याविषयी निरनिराळ्या सुरस कहाण्या कानावर
येऊ
लागल्या होत्या .त्याच्याभोवती असलेल्या या वलयाचा राजकीय
फायदा घेण्याचा काही राजकीय नेत्यांनी प्रयत्न
केला. मुंबापुरीवरील वर्चस्वासाठीच्य
ा या गँगवॉरला ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ असे
म्हणत एका बड्या नेत्याने जातीय रंग
देण्याचाही प्रयत्न केला. पुढे या नेत्यालाच आव्हान
देत गवळीने त्याला तोंडघशी पाडले, हा इतिहास
अनेकांच्या स्मरणात आहे.
गुन्हेगारीच्या सुरुवातीला गवळीला ‘भाई’ असे
संबोधले जात. पुढे हा शब्द एवढा रूढ
झाला की गुंडगिरीला आता भाईगिरी म्हटले जाते.
गवळीच्या या ‘भाई’ चा पुढे ‘डॅडी’ आणि नंतर
निकटवर्तियांसाठी ‘पप्पा’ झाला. पण
गवळी नावातील दहशत कमी झाली नाही.
लाखो लोकांचा मोर्चा मंत्रालयावर नेऊन
सर्वांना चकीत केलेल्या गवळीने लोकसभा निवडणुकीत
भायखळा मतदार संघातून तब्बल लाख भर मते घेतली.
2004 च्या विधान सभेच्या निवडणुकीत तो सहज
निवडून आला. त्याच्या अखिल भारतीय
सेनेच्या शाखाही खेडोपाड्यात पसरू लागल्या.
राजकीय पक्ष काढल्यावर त्याला शासकीय
संरक्षणाचे कवच लाभले.पण
त्याची टोळी संपली.एकापाठोपाठ एक विश्वासू
साथीदार मरण पावले.शूटर्सची रीघ
थांबली.वयोमानामुळे आणि जुन्या खटल्यांमुळे त्रस्त
झालेल्या गवळी च्या कारवायांवर मर्यादा येत
गेल्या.दाऊद,छोटा राजन,भाई ठाकुर समवेत त्याने
समझोता केल्याचे ही बोलले जाऊ लागले.अर्थात, असे
असले तरी अश्विन जुना हिशेब चुकविण्याच्या शक्यतेने
त्याला कायम
सावधानता बाळगावी लागते.साठीच्या घरात
पोचल्यावर त्याने अनेक व्याप कमी केले.मुले
मोठी झाली.मुलींचे विवाह झाले.एक मुलगी नगरसेवक
झाली.परीस्थिती बदलली,तरी मूळ स्वभाव
आणि व्यवसाय पूर्णपणे थांबला नाही.
दगडी चाळीतील आलीशान निवासस्थानात
नित्यनेमाने दरबार भरत होता. अनेक लहान-
मोठ्या विवादांमध्ये मध्यस्थीसाठी गवळीचा शब्द
अंतीम ठरत होता.वसुलीची छोटी-बडी कामे येत
होती.त्याच दरबारात मग पाच वर्षांपूर्वी नगरसेवक
जामसंडेकर यांची सुपारी आली आणि मग….?
पुढची सगळी कहाणी सर्व ज्ञात आहे. मुंबईतील
गँगवॉरचा प्रमुख सूत्रधार असलेला दगडी चाळीतील
हा डॉन अखेर तब्बल तीस वर्षांनंतर
अधिकृतरीत्या गुन्हेगार ठरला. कारागृहात
तो आत्मचरित्र लिहितोय असं नुकतंच कानावर आलं.
त्याच्यावर बहुदा चित्रपटही निघेल. पण
आपल्या जिंदगीची खरी कहाणी वाचकांसमोर
ठेवायचं धाडस आहे या डॉनमध्ये? आणि त्याने
लिहिली तर ती पचवण्याची ताकद राज्यकर्त्यांमध्ये
आहे? डॅडीबाबत माझा एक निराळाच योगायोग
आहे..90 च्या दशकात डॅडीबद्दल् पेपर्स, मासिकांमध्ये खूप
काही छापून येत होतं..पण, त्याला प्रत्यक्ष भेटून
त्याची मुलाखत घेणारा त्याच्या आयुष्यातील
मी पहिला पत्रकार ठरलो. पुढे
कितीही गॅंग़स्टर्सला भेटलो असलो,
तरी गवळी हा मला भेटलेला पहिला गॅंगस्टर…त्या
च्या मुलाखतीतील एक वाक्य मी कधीच विसरू शकणार
नाही…एवढा रक्तपात चाललाय, प्रतिस्पर्धी गॅंग्ज,
पोलीस, राजकीय नेते सगळेच तुझ्या मागे
लागलेत…कसा काय जगतोस तू….? असं
मी विचारलं…डॅडी म्हणाला…’मदर इंडिया’
बघितलास का?’ त्यात गाणं आहे बघ….दुनियामे हम आये
हैं तो… जिनाही पडेगा…जीवन है अगर जहर
तो पीनाऽऽही पडेगा….काही न
बोलता मी त्याचा निरोप घेतला…डॅडीच्य
आत्मचरि
मनोहर अर्जुन सुर्वे ( मन्या सुर्वे )
अगदी तुमच्या आमच्यासारखाच मराठी(रत्नागिरीकर). वयवर्षे ३८. आणि त्या दाऊदपेक्षा ११ वर्षांनी मोठा.
भार्गव मुंबई श्री झाला आणि त्याने भार्गवदादा हे संबोधन सिद्ध केले,  मनोहरचा मोठा सावत्रभाऊ म्हणजेच भार्गव सुर्वे.
१९६८ भार्गवचा दबदबा दादर,आगाबझारमध्ये वाढतच होता.एका वसुलीप्रकरणात (५००००) दांडेकरचा मॅटर झाला आणि मनोहरला सर्वप्रथम भार्गवसोबत जेलची हवा मिळाली.
पुण्यात येरवड्यात असताना ससूनमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसलेला असताना दोन जिवलग मित्र पुण्याचा बज्या पाटील आणि भिवंडीचा मुनीरशेख यांच्याशी जवळीक झाली.पण रत्नागिरी जेलच्या भिंती त्याला जास्त दिवस रोखू शकल्या नाहीत मनोहर फरार.
आज जरी wikipedia त्याला डकैत म्हणत असेल तरी त्या काळातली त्याची दहशत मुंबई पोलिसांना चांगलीच माहित होती.त्यांने मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपली गँग बनवली.जवळपास१० वर्षांच्या जेलमध्ये james hadley chase यांच्या novels वाचून बाहेर पडल्यानंतर तीन वर्षात सर्व मुंबईला वेड लावले होते.
मुंबई पोलिसांठी तो खूप अवघड काळ होता.प्रत्येक पोलिस-स्टेशनला मनोहरच्या नावाने गुन्हा होता.
  कधी किर्तीकर काॅलेजचा सर्वात हुशार विद्यार्थी आज सराईत गुन्हेगार झाला होता.
त्याने आता james hadley chase समोर ठेवले आणि एक प्लँन बनविला साबिर ईब्राहिम कासकर याचा मर्डर प्लॅन आणि सत्यात उतरवलासुद्धा -हे सुद्धा आजच्या wikipedia ने लपवून ठेवलय.
कालच्या एका मराठी मुलाने दाऊदच्या भावाची गेम करावी,  हे कोणालाच पटलं नाही, कारण दाऊद आणि मनोहर कधीच समोरासमोर भेटले नाहीत आणि पूर्वी त्यांचा कधी संबंध आलाच नाही.
हे फक्त तो एक proffesionalहोता हेच सिद्ध करते, ते पठाणांनी करवून घेतले.
शेवटी १९८२ च्याा सुरूवातीलाच मनोहरचा एन्काँन्टर-पोलिसांच्या इतिहासातील पहिला, झाला.
शरीरात ६ बुलेट लागले असतानासुद्धा त्याने पोलिसांचा प्रतिकार केला, यावरून त्याची शरीराची क्षमता लक्षात येईलच.तो एक हुशार गँगस्टर होता, त्याच्याकडे नेहमी एक विदेशी बनावटीच पिस्तुल,अँसिडची  एक छोटी बॅाटल असे.
तो त्याचे planकधीच उघड करत नसे.तो तसा संशयीसुद्दा होता.त्याच्या गँगमध्ये ५० पेक्षा जास्त लोक होते.
अगदी टिपीकल हॅालिवूडच्या विलनसारखी त्याची विचारसरणी होती, म्हणूनच मनोहर ह्यात नसतानासुद्धा  आज त्याचे हजारो चाहते आहेत

वजन कमी करण्यासाठी मोलाच्या आयुर्वेदिक टिप्स

आयुर्वेदिक म्हटल्याबरोबर आपल्या मनात प्रथम येतं ” परिणाम
हळू होत असला तरी साईड -इफेक्ट नसतात” .
आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत
ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल . वर्षानुवर्ष
सतत अभ्यास केल्यावर असा अनुभव येतो की
आयुर्वेदात नमूद केलेली औषधे व आरोग्य विषयक
मूलभूत सिध्दांत हे त्रिकालाबाधित सत्य आहेत. पित्तशमन औषधे
व मेदनाशक औषधांची जोडी मेद
कमी करण्यासाठी कशी कार्य
करते ह्या विषयी थोडक्यात माहिती बघूया.
वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या
क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे
मेद विलयन करून तो शरीराबाहेर काढणे. ह्याला
मेदनाशक औषधांचा ( थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा
वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो.
चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो . ऊष्णतेमुळे
सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका
ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेदनाशक औषधे
स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात . त्यामुळे आपोआप
भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे
घशाशी आंबट /कडू येणे , छातीत जळजळ
होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे
बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते .
पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त
स्राव कमी होतो , भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा
वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण
गुणांपासून आतड्यांच्या नाजुक आवरणाचे संरक्षण होते .
ही प्रक्रिया योग्य रीतीने
होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते
तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशकच्या
२ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात . आपला आहार- विहार हा
शरीरातील सर्व
घडामोडींसाठी कारणीभूत
असतो . त्यामुळे आहार -विहार आहे तसाच चालू ठेवून वजन
कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे
ठरेल.
गोड पदार्थ किंवा तळलेले /तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत
ही बाब अगदी लहान मुलांना पण
माहिती असते . आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत
सिध्दांतांच्या आधारे काही लहान – सहान
गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व
प्रकृती उत्तम राहते . ही
माहिती वाचताना आपल्याला काही
गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या
विरुध्द वाटतील , पण ह्या गोष्टी अनेक
पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक
प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या
सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य
नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक
महत्त्वाचे कारण आहे . हा मुद्दा नीट
समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा . एक
दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात
काही गोड पदार्थ खा. १- २ दिवसांनी तोच
गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा.
आपल्याला नेहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल . म्हणजेच
आपल्याला जेवढी खरी भूक आहे तेवढेच
अन्न घेतले जाते , अनावश्यक किंवा अवाजवी अन्न
घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते . जेवणानंतर पान
खाण्याची पद्दत योग्यच नव्हे तर
शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा
न घेता , जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये , एवढा अर्थ
नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा
आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
सर्व फळांमधे कमी -जास्त प्रमाणात साखर असते . त्या
साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट
चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व
सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व
असतात . आपण फक्त चवीच्या
सुखानुभवापायी ही जीवनसत्व
वाया घालवतो . वजन कमी करण्याचा निश्चय
केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या
बिया व साली फेकून देऊ नयेत .
चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो . ऊष्णतेमुळे
सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका
ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन
कमी करण्याची खरी इच्छा
असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड
पदार्थ घेणे वर्ज्य करा . चरबीच्या
नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण
स्वभावी पाचक -स्राव तयार करीत असते .
मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली
बहुतेक सर्व औषधे पाचक -स्राव वाढवूनच चरबी
कमी करतात . अन्न घेतल्यानंतर लगेच थंड
पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी ,
आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या
पाचक -स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी
साठून राहण्यासाठी कारण होते . अन्न पचवणारे पाचक –
स्राव विस्तवासारखे ऊष्ण असतात . त्यावर थंड पदार्थ किंवा थंड
पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार
करा .
चहा- कॉफी सारखी साखरयुक्त पेय
दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत . त्याच्या घोटा घोटा बरोबर
पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी
वाढविण्यास कारण होते .
जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये .
शतपावली करणे चांगले . जेवणानंतर येणारी
झोप ही खरी झोप नसून ती
केवळ सुस्ती असते , ज्याने शरीराचा
बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या
नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन
वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण
देण्यासारखेच आहे .
लवकर झोपून लवकर उठावे , हा नियम आरोग्यासाठी
खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून
उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक
तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते .
दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत . दुधातील
पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची
गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर
चरबीत होते . दुधाचे दात पडले की
नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे .
निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना
ही मांसाहार पचनासाठी
केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय
चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक
किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात
मांसाहार घ्यावा.
बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा ,
सुस्ती आणि आळशीपणा टाळा.
दारावरची बेल वाजली की ‘दुसरा
कोणी उठण्याआधी आपण दार
उघडण्यासाठी उठा ’ , अशा साध्या -सोप्या
सवयी अंगी बाळगण्यामुळे
शारीरिक हालचाली वाढून वजन
वाढण्याची सवय कमी होते .
दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन
वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण
आरोग्यासाठी पण अत्यंत हानिकारक आहे.
अशी सवय लागली असेल तर
ती ताबडतोब सोडावी, चांगल्या
मुहूर्ताची वाट बघू नये . सवय मोडतांना
काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले
परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार
नाही.
जेवण झाल्यानंतर “ आता पोट भरले , आता आणखीन
अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो . पोट भरल्या नंतर १०
ते १५ मिनिटानंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा
मेंदूतून कार्यरत होते . म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन
झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा,
“ अजून खरोखर भूक आहे का ?” जर उत्तर “ नाही ”
मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून
‘बस्स ’ करा .
जास्त जेवण घेण्याची सवय चरबी
वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास
कमी घेण्याची सवय केली तर
थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम
राहते .
‘भात खाण्यामुळे वजन वाढते ’ असा एक गैरसमज सर्वत्र
आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न
आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे .
अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण
भारतीयांची एकूण प्रकृती
बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन
काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते .
तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात
शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे
भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण
त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात .
तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा . वजन
कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात
म्हणून फार उपयोगी होतो . व्यवस्थित जेवण
झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना
थंड करण्याची किमया ह्या ‘ शेवटच्या भातामुळे ’ होते .
केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे .
दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या
विषयी अनेक मतभेद आढळतात . कोणी
सांगतात “ थोड्या -थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या
मते “ ठराविक वेळी पोटभर जेवावे ” , अशा
वेळी काय बरोबर व काय नाही
अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर
करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी
‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे . आयुर्वेदात
“ याम मध्ये न भोक्तव्यं , याम युग्मं न लंघयेत् ” असा श्लोक
आहे. ह्याचा अर्थ “ चार तासांच्या आधी
काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ
उपाशी राहू नये. ”
मद्यपान करण्याची आवड असेल तर
त्याविषयी थोडी शास्त्रीय
माहीती : मद्यपान करण्याची
भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच
जेवणाचा कार्यक्रम असतो . मद्यपानामुळे पाचक -स्राव वाढतात व
परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा
जास्त आहार घेतला जातो . जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे
वाढलेले पाचक -स्राव हे अन्न लवकरात लवकर
पचवण्यासाठी उपयोगी पडतात . शिवाय
जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपानामुळे सर्व
अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय
प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे . म्हणून मद्यपान
करण्याची आवड असलेल्यांनी
जेवणानंतरच मद्यपान करावे . ज्यांना चरबी
वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या
आधी घेऊन चालेल .
कडधान्यांबद्दल थोडक्यात : मोड आलेली कडधान्य
स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक
ठिकाणी वाचले असेल. काही
अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा
मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती
उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय
असेल तरच मोड आलेली कडधान्य
खावीत . वयाच्या ४५ -५० नंतर ही
कडधान्य त्रासदायक ठरतात . ह्या वया नंतर ‘ भर्जित’ म्हणजे
भाजलेले धान्यच आहारात वापरावे . भाजलेल्या धान्याला
कितीही भिजवले तरी मोड येत
नाहीत. मेद किंवा चरबी विषयी
जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे.
ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर
आहारात नियमितपणे करावा .
व्यायाम कसा , कोणता व किती करावा : व्यायामाचे
फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या
विषयाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी
म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा त्यात
किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन
कमी करण्यासाठी कशा प्रकारचे व्यायाम
करावेत ? शरीरात मेद कुठे साठतो ? चरबीच्या
पेशी कुठे जमा होतात ? काही प्रकारचे
व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही
व्यायाम चरबी हटवतात . त्वचा आणि मांसधातूच्यामधे
ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात .
त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे
व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम . ओला
कपडा लवकर सुकण्यासाठी जी
पिळण्याची पध्दत आहे तशी
ही व्यायामाची क्रिया करावी

गुंड सुमित ठाकूरच्या मुसक्या आवळल्या

प्राध्यापक मल्हार म्हस्के यांना धमकावण्या
प्रकरणी सुमित ठाकूर फरार होता. मात्र, आज
त्याला पोलीसांनी अटक केलं आहे.
भाजयुमोचा फरार पदाधिकारी सुमित ठाकूरच्या
नागपूर पोलीसांना मुसक्या आवळल्या. नागपूर
क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे.
अमरावतीतील धामणगाव येथून क्राईम ब्रांचने
त्याला ताब्यात घेतलं. मागील २० दिवसांपासून
सुमित ठाकूर फरार होता. अमरावतीहून त्याला
नागपूरच्या पोलिस हेडक्वाटरमध्ये आणले जाणार
आहे.
सुमित ठाकूर याने प्राध्यापक मल्हार म्हस्के
यांच्या जवळपास ९ दिवसांत तीन गाड्यांची
तोडफोड व जाळपोळ केली होती. गुंडागर्दी करून
उलट म्हस्केंकडूनच त्याने नुकसान भरपाई मागितली
होती. तर म्हस्के तक्रार दाखल करण्यासाठी जात
असताना त्यांना दमदाटी करत धमकी दिली
होत