प्रशांत दामले यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर:

Abhiman maharashtracha.

प्रशांत दामले यांना दीनानाथ
पुरस्कार जाहीर:
====================================
मुंबई : प्रदीर्घ
नाट्यसेवेसाठी दिला जाणारा ‘मास्टर
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा
प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
हृदयनाथ मंगेशकर यांनी या
पुरस्काराची घोषणा केली.
‘कार्टी काळजात
घुसली’चा १००वा प्रयोग
दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या
वेळी घोषणा करण्यात
आली.
प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि
त्यांनी मराठी
रंगभूमीची
गेली तीन दशके अविरत
सेवा
केली आहे.
हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय
कमी असल्याचा मुद्दा उपस्थित
झाला, पण कमी वयातही
त्यांनी केलेली
कामगिरी मोठी आहे.
त्यामुळे पुरस्कारासाठी
त्यांचीच निवड योग्य असल्याचे
हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.
हा प्रयोग पाहण्यास हृदयनाथ मंगेशकर
यांची कन्या आणि पार्श्वगायिका राधा
मंगेशकरही उपस्थित होत्या.
पुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर
दीनानाथ यांच्या
पुण्यतिथीदिनी गानकोकिळा
लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. या
वेळी दामले यांनी त्यांच्या
३३ वर्षांच्या
कारकिर्दीतील हा एक
महत्त्वाचा आणि अविस्मरणीय
टप्पा असल्याचे नमूद केले.
(प्रतिनिधी)
हा टप्पा गाठेन असे वाटले नव्हते!
नाबाद शंभरीविषयी दामले
म्हणाले, ‘मी
रंगभूमीवरील
कारकिर्दीत ११ हजार नाट्यप्रयोगांचा
टप्पा पार करेन, असे कधी वाटलेच
नव्हते, पण कुटुंबाची साथ,
मित्रपरिवाराने दाखवलेला विश्वास आणि
रसिकांनी भरभरून दिलेले प्रेम, यामुळे
मला हे साध्य करता आले. ‘कार्टी
काळजात घुसली’ या
नाटकातील कालिदास कान्हेरे अर्थात
कांचनच्या वडिलांची भूमिका हे
माझ्यासाठी एक आव्हान होते.’

फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न फुले दाम्पत्याला भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न

फुले दाम्पत्याला भारतरत्न
मिळण्यासाठी प्रयत्न फुले दाम्पत्याला भारतरत्न
मिळण्यासाठी प्रयत्न
______________________________++++++++++++
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई
ज्योतिबा फुले या दाम्पत्याने सर्व समाजबांधवांची
प्रगती व उन्नती व्हावी
यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याला तोड
नाही. खऱ्या अर्थाने त्यांना भारतरत्न मिळणे हा
भारतरत्न पदाचा सन्मान होय. यासाठी राज्य सरकार
प्रयत्नशील असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी रविवारी
दिली. अखिल भारतीय माळी
महासंघातर्फे आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले,
अखिल भारतीय माळी महासंघाचे
राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे,
अध्यक्ष संभाजी पगारे, प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे
आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, फुले दाम्पत्याला योग्य
वेळी त्यांना हा सन्मान सरकारकडून देण्यात येईल.
यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. फुले
यांच्या विचारावर आमचे शासन काम करते. त्यांच्या आदर्शाचा आधार
घेऊ न दीनदलित, शोषित-पीडित
यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी शासन
कटिबद्ध आहे. तसेच माळी समाजाचे राज्यात चांगले
संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजाकरिता दिशादर्शक
उपक्रम राबविला जात आहे.
यावेळी अविनाश ठाकरे, संभाजी पगारे,
शंकरराव लिंगे, शहर कार्याध्यक्ष गोविंद वैरागडे व कार्याध्यक्ष
ज्ञानेशवर लोखंडे आदींनी मार्गदर्शन
केले. मेळाव्यात विविध प्रस्ताव पारित करून फुले दाम्पत्याला
भारतरत्न हा सन्मान देण्यात यावा, अशी
मागणी करण्यात आली. वधू-वर सूचक
मेळाव्यात ५५० युवक-युवतींनी
नोंदणी के ली होती.
यातील ३०० जणांचा परिचय करून देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गिरडकर, शहर
सरचिटणीस कैलास जामगडे आदी मान्यवर
उपस्थित होेते. या मेळाव्याला युवक-युवती व
पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. संचालन प्रा. कविता
भोपळे यांनी तर आभार मधुसूदन देशमुख
यांनी मानले. (प्रतिनिधी)
______________________________++++++++++++
नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई
ज्योतिबा फुले या दाम्पत्याने सर्व समाजबांधवांची
प्रगती व उन्नती व्हावी
यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याला तोड
नाही. खऱ्या अर्थाने त्यांना भारतरत्न मिळणे हा
भारतरत्न पदाचा सन्मान होय. यासाठी राज्य सरकार
प्रयत्नशील असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी रविवारी
दिली. अखिल भारतीय माळी
महासंघातर्फे आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल सोले,
अखिल भारतीय माळी महासंघाचे
राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश ठाकरे,
अध्यक्ष संभाजी पगारे, प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे
आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, फुले दाम्पत्याला योग्य
वेळी त्यांना हा सन्मान सरकारकडून देण्यात येईल.
यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. फुले
यांच्या विचारावर आमचे शासन काम करते. त्यांच्या आदर्शाचा आधार
घेऊ न दीनदलित, शोषित-पीडित
यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी शासन
कटिबद्ध आहे. तसेच माळी समाजाचे राज्यात चांगले
संघटन आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजाकरिता दिशादर्शक
उपक्रम राबविला जात आहे.
यावेळी अविनाश ठाकरे, संभाजी पगारे,
शंकरराव लिंगे, शहर कार्याध्यक्ष गोविंद वैरागडे व कार्याध्यक्ष
ज्ञानेशवर लोखंडे आदींनी मार्गदर्शन
केले. मेळाव्यात विविध प्रस्ताव पारित करून फुले दाम्पत्याला
भारतरत्न हा सन्मान देण्यात यावा, अशी
मागणी करण्यात आली. वधू-वर सूचक
मेळाव्यात ५५० युवक-युवतींनी
नोंदणी के ली होती.
यातील ३०० जणांचा परिचय करून देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गिरडकर, शहर
सरचिटणीस कैलास जामगडे आदी मान्यवर
उपस्थित होेते. या मेळाव्याला युवक-युवती व
पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. संचालन प्रा. कविता
भोपळे यांनी तर आभार मधुसूदन देशमुख
यांनी मानले. (प्रतिनिधी)

अरेंज मॅरेज का म्हणून उत्तम असत

Facebook/navmaharashtranews.com

image

Navmaharashtra News
तुमच्यासाठी जोडीदाराचा शोध, तुमच्या
कुटुंबीयांद्वारे केला जातो. नंतर कुटुंबीयांकडून
संपूर्ण विधी-विधानाने लग्न लावण्यात येते.
आता त्याला निभावून घेणे आणि नाते टिकवून
ठेवण्याची जबाबदारी तुमची असते.
आमच्या समाजात आज देखील अरेंज मॅरेजला जास्त
महत्त्व देण्यात येते. मग त्याचे मुख्य कारण काय आहे,
हे जाणून घेऊ.
1. सामाजिक रूपेण अनुकूल: कुटुंबाने शोधलेला
जोडीदार तुमच्या समाज आणि समुदाय इत्यादीशी
निगडित असतो. अशात तुम्हाला तुमच्या संस्कृतीत
जास्त बदल करावा लागत नाही. सणावारापासून
संस्कारापर्यंत तुम्हाला काही नवीन वाटत नाही,
ज्यामुळे जास्त ओढाताण करावी लागत नाही.
2. आपसी सन्मान: कुटुंबीयांनी शोधलेल्या
जोडीदाराबद्दल सर्वांना नेहमी सन्मान असतो
कारण कुठे ना कुठे अप्रत्यक्ष रूपेण पारिवारिक
दबाव तुमच्यावर राहतो. तुम्ही दोघेही दांपत्य
बंधनात अडकल्यानंतर बाकी नात्यांना तुम्ही
दुर्लक्ष करू शकत नाही.
3. पारिवारिक संबंध : अरेंज मॅरेज केल्यानंतर
तुम्हाला कुठेही तोंड लपवण्याची गरज पडत नाही
आणि कुठलीही सफाई देण्याची देखील गरज भासत
नाही. परिवारासोबत तुमचे नाते नेहमी मधुर
राहतात.

सूर्यनमस्काराचे फायदे

Navmahanews@gmail.com

सूर्यनमस्काराचे फायदे
आजकाल फिटनेसप्रति सजगता वाढतेय.
बॉलीवूडच्या बलदंड नायक आणि सुकुमार
नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण
व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अँण्ड फाईन
ठेवण्यासाठी वर्कआऊट,डाएटिंग आदींची जोरदार
तयारी करतात. मात्र साध्या सूर्यनमस्कारातूनही
शरीराला परिपूर्ण व्यायाम मिळण्याची तजवीज
आहे.
नियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास फिटनेस राखणे
सहज सुलभ होऊ शकते. या एका व्यायाम प्रकारात
विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट
आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम
प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसने
आहेत. बारा आसने करताना बारा श्लोकांचे
उच्चारण होते. योग्य प्रशिक्षकाच्या
मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घातल्यास अत्यंत
कमी अवधीत चांगले परिणाम दिसून येतात.
सुरुवातीला एका वेळी तीन नमस्कार घालून नंतर
संख्या वाढवली जाते.