महिलांना शनिदर्शन का नाही?

औरंगाबाद – 31 जानेवारी : शनी
शिंगणापूर प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या
खंडपीठाने अहमदनगर जिल्हाधिकार्यांना
नोटीस बजावली आहे.
शनी शिंगनापूर प्रकरणी चार
आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला
ही नोटीस प्राप्त
झालीये.
डॉक्टर वसुधा पवार यांनी शनीच्या
चौथर्यावर पुरुषांसह महिलांनाही प्रवेश मिळावा
आणि पूजेचा समान आधिकार मिळाला पाहिजे, या संदर्भात
औरंगाबाद खंडपीठत जनहित याचिका दाखल
केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांसह
पोलीस अधीक्षक, मुंबई धर्मादाय
आयुक्त आणि राज्याचे विधि-न्याय खात्याचे मुख्य सचिवाना
नोटीस बजावली आहे.
शनी मंदिरात महिलांना प्रवेश का दिला जात
नाही याबद्दल या नोटिसीमध्ये विचारणा
करण्यात आली आहे. याबद्दल
जिल्ह्याधिकार्यांना चार आठवड्यात खुलासा द्यायचा आहे.

Posted from navmaharashtranews

Advertisements

पुणे”पुण्यनगरी”दर्शन

विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची
सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला
आपण भेट देणार असाल तर ‘ पुणे दर्शन ‘ शिवाय ती
भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या
खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर
परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल)
पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन
तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल
आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे
पहाण्यासाठी म्हणुन जे आले आहेत त्यांच्या
साठी हि एक अतिशय चांगली सुविधा आहे.
पुण्यातल्या व पुण्याच्या आसपासच्या अनेक सुंदर, ऐतिहासिक
अश्या स्थळांचे दर्शन घडवणारि हि सहल फक्त एका दिवसात
पुर्ण होते आणि या मुळेच पर्यटकांच्या वेळेची,
पैशाची व ताकतीची बचत
होणे शक्य होते.
पुण्याच्या
पर्यटन
स्थळांमधुन
पुण्याची संस्कॄती, वारसा आणि इतिहास
झळकतो. समुद्र सपाटी पासुन ५६०
मीटर्स उंची वर पुणे वसलेले आहे.
सर्वच ऋतुंमध्ये पुणे पाहता येऊ शकते म्हणुनच वर्षाच्या
कोणत्याहि महिन्यात आपण पुणे शहर पाहण्यासाठी
येऊ शकता. पुण्याने आधुनिकते सोबतच आपली
संस्कृतीही जपुन ठेवली
आहे हे आपल्याला जाणवते जेंव्हा आपण पुण्यातल्या काहि
प्रसिद्ध मंदिरांना भेटी देतो जसे कि –
चतुॠंगी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई
गणेपती मंदिर, सारसबाग गणपती मंदिर
इत्यादी. याच बरोबर दगडांमध्ये काम करुन बनवलेल्या
ऐतिहासिक पाताळेश्वर लेण्या व शंकराचे मंदिर, १६ व्या
शतकातील शनिवार वाडा, १८९२ मध्ये बांधलेला
आगाखान पैलेस यांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. पुणे शहरा मध्ये
काहि प्रमुख संग्रहालये देखिल आहेत – टिळक संग्रहालय,
केळकर संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय,
ट्रायबल संग्रहालय इत्यादी. पुण्याचा प्रचंड असा
ऐतिहासिक वारसा व पुण्याचे महाराष्ट्र व देशाच्या
जडणघडणी मध्ये असलेले योगदान तुम्हाला पुणे
दर्शन मध्ये पाहण्यास मिळेल हे नक्कि.
पुणे दर्शन मध्ये दाखवण्यात येणारी प्रमुख स्थळे:
पाताळेश्वर लेण्या
पुणे विद्यापीठ
चतुॠंगी मंदिर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय
टिळक संग्रहालय
शनिवार वाडा
लाल महल
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
मंदिर
फुलेवाडा
सारसबाग गणपती मंदिर
पेशवे उद्यान
महालक्ष्मी मंदिर
स्वामी विवेकानंद संग्रहालय
राजीव गांधी प्राणी
संग्रहालय, कात्रज (कात्रज स्नेक पार्क)
महादजी शिंदे छत्री
(समाधी स्थळ)
राष्ट्रिय युद्ध स्मारक
पुणे ट्रायबल संग्रहालय
ओशो गार्डन
आगा खान पैलेस
वरिल ठिकाणी पुणे दर्शनची बस जाते,
ट्रिपची सुरवात व अंत पुणे रेल्वे स्टेशन इथुन होतो.
पी.एम.पी.एम.एल आपल्या बसने
आपला प्रवास सुखाचा व आनंदाचा होवो या साठी
प्रयत्न करतेच. पुणे दर्शनची बस पुण्यातुन दोन
ठिकाणांहुन सुटते मोलिदीना स्टैंड (पुणे रेल्वे स्टेशन)
आणि डेक्कन जिमखाना (डेक्कन बस स्टैंड). बसेस
सकाळी ९.०० ला सुटते व परत
संध्याकाळी ५.०० ला येतात. पुणे
दर्शनची बस तुम्ही सकाळी
८.०० ते ११.३० व दुपारी ३.०० ते ६.०० या
वेळांमध्ये आरक्षित करु शकता. येणारा खर्च अंदाजे १५० रु.
प्रती व्यक्ती.
कमीत कमी वेळेत, पैशांत व कष्टांत पुणे
पहाण्याचा पुणे दर्शन हा अत्यंत किफायतशीर असा
मार्ग आहे. जेंव्हा तुम्हि पुण्यामध्ये येण्याची योजना
आखाल त्या वेळी पुणे दर्शनाचा पर्याय नक्कि निवडा.
हे लक्षात असु द्या:
फुलेवाडा रविवारी बंद असतो
पेशवे उद्यान व राजिव गांधी प्राणि संग्रहालय
बुधवारी बंद असतात

Posted from navmaharashtranews

बाळाचे पाय राजकारणात:छोटा पुढारी

नवमहाराष्ट्र न्यूज
स्पेशल रिपोर्ट

श्रीगोंदे – वय वर्षे तेरा-चौदा, वामनमूर्ती.
खेळण्या बागडण्याचे दिवस. मात्र श्रीगोंद्याचा घनश्याम
दत्तात्रेय दरोडे (टाकळी लोणार) हा छोटा
मल्लीनाथ आप ल्या वाक् बाणांनी सरकारसह
अनेकांना घायाळ करत आहे. त्याचे शाब्दिक पंच सध्या सोशल
मीडियावर व्हायरल झाले आहेत. बेधडकपणे आपले
मत व्यक्त केल्यानंतर तो ‘तुम्हीच सांगा बरं राव, आँ’
असे विचारण्यासही विसरत नाही.
इयत्ता आठवीत शिकणारा घनश्याम
गावातील राजकारणापासून ते तालुका राज्यातील
परिस्थितीवर जेव्हा तो बोलू लागतो तेव्हा त्याच्या शाब्दिक
फटकाऱ्यांनी अनेक जण निरूत्तर होतात.
वीज, पाणी, शेती, सहकार,
बाजारभाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळावर उपाय
आदी अनेक प्रश्नांवर तो बेधडक बोलतो. विशेष
म्हणजे त्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करता येणार
नाही. अशी त्याची उदाहरणे
परिपक्व असतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याच्या
भाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर
व्हायरल झाल्याने तो एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याच्या मुलाखती
प्रसारित केल्याने छोटा घनश्याम रातोरात स्टार झाला.
बहिणीनंतर आई-वडिलांना घनश्याम हा एकुलता एक
मुलगा. शेतकरी कुटुंबात तो वाढला. घरची
परिस्थिती जेमतेम. काही दिवस तो
घारगावच्या (ता. श्रीगोंदे) आश्रम शाळेत शिकत होता.
पुढे तो मूळ गावी परतला. त्याची
खरी ओळख झाली विधानसभा निवडणूक
प्रचारादरम्यान. माजी मंत्री बबनराव
पाचपुतेंच्या विरोधात त्याने राहुल जगताप (राष्ट्रवादी)
यांचा प्रचार केला. त्याच्या भाषणांना टाळ्यांचा पाऊस पडत होता.
पाचपुते पडले जगताप आमदार झाले. यातून घनश्यामचा
आत्मविश्वास दुणावला. ‘दिव्य मराठी’च्या
प्रतिनिधीने त्याची भेट घेवून प्रतिक्रिया
विचारली असता ‘माझं महत्त्व आताशी
पटलं का, असा प्रतिप्रश्न केला. शेतकऱ्यांचे जीवन
किती खडतर आहे हे एकदा निर्णय घेणाऱ्या
मंडळींनी शेतकऱ्यांसोबत काही
दिवस राहून समजून घ्यावे, असा सल्ला देण्यास तो विसरला
नाही. कांद्याचा दर ९० रुपयांवरून १० रुपयांवर घसरतो.
दुधापेक्षा पाणी दुप्पट किमतीने विकले जाते,
प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचे दर ठरवतो; मात्र
शेती मालाचे दर शेतकरी नाही
तर ग्राहक ठरवतो हा अन्याय नाही का, असे
शेती धंद्याचे अर्थशास्त्र तो बोबड्या भाषेत सांगत होता.
कलेक्टर होऊन व्यवस्था बदलायची आहे :
राज्य केंद्रात झालेल्या सत्तांतरातून देखील
शेतकऱ्यांची समस्या कायम असल्याचे सांगत
ही तर “जुन्या बाटलीत नवी
दारू’ असल्याची उपमा त्याने दिली. आपण
कोणी राजकीय पुढारी किंवा नेते
नाहीत, याची स्वतः ला जाणीव
करून देत घनश्याम म्हणाला, व्यवस्था परिवर्तन करणे एकट्याचे
काम नाही. मात्र या व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक
असलेल्या प्रशासनात मला जायचेय. कलेक्टर होण्याचा चंग
मी बांधलाय, मी तो होणारच. त्या नंतर पहा
मी काय करतो ते.
शेतकऱ्यांनी कोणते पाप केले?
पाणी नाही, वीज गायब,
पीकांवर पडलेला रोग, यातून शेतकऱ्यांच्या हातात
काहीच पडले नाही. शेतकरी
आत्महत्या करतात, त्यांच्या कुटुंबीयाची
परवड होते. शेतकऱ्यांनी पिकवणे बंद केले तर लोक
रस्त्यावर येतील. दोन आठवड्यापूर्वी
कांद्याला ९० रूपये दर होता. आता १० रुपये, उत्पादन खर्च निघाला
नाही. शेतकऱ्यांने असे कोणते पाप केलेत?
– घनश्याम दरोडे, श्रीगोंदे.

Posted from navmaharashtranews

कडेगांवला शाही थाटात जिजाऊ – विवेकानंद मिरवणूक

image

सांगली-ता.कडेगाव
कडेगांवला शाही थाटात जिजाऊ – विवेकानंद मिरवणूक
राष्ट्रीय युवा दिन : पारंपारिक वाद्यांच्या जल्लोषात तरुणाईची राष्ट्राजागरण मोहीम, राष्ट्रीय युवा दिनानिम्मित्त तरुणाईने राजमाता जिजाऊ व राष्ट्रगुरू  स्वामी विवेकानंदांची मिरवणूक कडेगाव शहरातून काढण्यात आली. पारंपारिक वाद्ये, युवक प्रेरणा संदेश आणि विवेकवाणीची पुस्तके या अध्यात्मिक वातावरणात तरुणाईचे विशाल रूप कडेगावच्या रस्त्यावर पहायला मिळाले.
युवक जनजागृतीसाठी कडेगाव शहरात ठिकठिकाणी विवेक संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. तसेच युवकांच्याकडून शाळेमध्ये विवेकानंदांचे संदेश देणारी यश प्राप्तीचा मार्ग हि पुस्तके वाटण्यात आली. आधुनिक वाद्यांना फाटा देऊन पारंपारिक वाद्ये ढोल-ताशा च्या गजरात मिरवणूक, तसेच राजकीय अथवा इतर कोणत्याही प्रसंगी निघणाऱ्या मिरवणुकीपेक्षा यश प्राप्तीचे संदेश देणारी प्रबोधनपर मिरवणूक असल्याने  सामान्य नागरिकांच्या तोंडून वाह:वाह: येत होती.
मिरवणुकीचे आयोजन कडेगाव व शिवाजीनगर मधील युवक मित्रांनी एकत्र येऊन केले.
बलशाली विकसित भारतासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची गरज आहे. युवकांनी विवेकानंदांच्या विचारास अनुसरून राजकारण विरहित समाजकार्य करण्याचे आवाहन कडेगावातील आयोजकांनी
केले.

Posted from navmaharashtranews

तासगावात पत्रकार व कुटुंबास मारहान

image
तासगाव तालुक्यातील निमणी येथील दैनिक पुढारीचे पत्रकार पी. डी. गुरव यांच्यासह त्यांचा मुलगा,पत्नी व भावजय यांना गावगुंडांनी घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी 5 जणांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

     गावातील ट्रान्सफॉर्मरच्या फ्यूज काढणाऱ्याविरोधात वीज महावितरण कंपनीत तक्रार दिल्याच्या व या प्रकरणाची बातमी लागेल, या गोष्टीचा राग मनात धरून गावगुंडानी मारहाण केली. यावेळी गुरव यांच्या घरातील महिलांनाही मारहाण करून विनयभंगही करण्यात आला.

    याप्रकरणी राजेंद्र आनंदराव पाटील, विनायक रघुनाथ पाटील, प्रदीप बाळासो पाटील, किरण गजानन पाटील व सचिन किसन पाटील (सर्व रा. निमणी, ता. तासगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

     निमणी येथील गावगुंडांच्या गुंडगिरीचा जिल्ह्यातील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. याप्रकरणी दोषींना तातडीने अटक झाली पाहिजे अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा पत्रकारांनी दिला आहे.

-मिलिंद पोळ,तासगाव

मकर संक्रांति च्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा।। “तिळ गुळ घ्या गोडगोड बोला

image

मकर संक्रांति च्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा।। “तिळ गुळ घ्या गोडगोड बोला
-नवमहाराष्ट्र न्यूज समूह

Posted from navmaharashtranews