दुचाकी अपघातात महिला आरोग्य कर्मचार्याचा मृत्यू

दुचाकी अपघातात महिला आरोग्य कर्मचार्याचा मृत्यू
हदगाव – हिमायतनगर

हिमायतनगर(प्रतिनिधी)भोकर येथे झालेल्या ब्लॉक आढावा बैठकीहून – हिमायतनगरकडे परत येणाऱ्या एका महिला आरोग्य कर्मचार्याचा ट्रक – दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना दि.१३ च्या रात्री घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या फुलेनगर उपकेंद्रात कार्यरत असलेली महिला आरोग्य कर्मचारी सविता ए. चौरे ह्या पतीसह भोकर येथे आयोजित तीन तालुक्याच्या संयुक्त ब्लॉक लेवल बैठकीस गेल्या होत्या. बैठकीचे आयोजन हे सकाळी १० वाजता केले असताना जिल्हा आरोग्य अधिकारी श्री के.आर.शेळके यांनी १२.३० वाजता उपस्थिती लावली. त्यामुळे सदर बैठकीत मासिक आढावा घेण्यात आल्या, बैठकीचे आयोजन करण्यात आलेल्या खोलीत उजेडाची सोय सुद्धा नव्हती अश्या परिस्थितीत सदर बैठक हि सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत हि मिटिंग चालली. सायंकाळी उशीर झाल्याने श्रीमती चौरे आपल्या पतीसह घाई गडबडीने मिटींग आटोपून दुचाकीने हिमायतनगर कडे निघाल्या.

दरम्यान भोकर तालुक्यातील शिंगारवाडी – सोमठाना पाटीजवळ येताच रस्त्यावरील खड्ड्यामुळे समोरून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक ए.पी.११ – व्ही ९२११ ने दुचाकीला जब धडक दिली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघातात महिला कर्मचारी ह्या जागीच गतप्राण झाल्या. त्यांच्या मृत्यू पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पती असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केले जात आहे. त्या मुळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील गावसूद येथील रहिवाशी असून, त्यांच्या मनमिळावू, कर्तव्यदक्ष स्वभावाने रुग्णालयात येणाऱ्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या होत्या. अश्या कर्तव्यदक्ष महिला आरोग्य कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची माहिती असताना देखील जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भेट देणे तर सोडाच साधी विचारपूसही केली नाही.

अधिकार्याच्या बेजबाबदार कार्यामुळे बैठकीस आलेल्या ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला असून, वरिष्ठ अधिकार्यांना महिला कर्मचार्याबाबत किती अनास्था आहे ये यावरून दिसून आले आहे. त्यामुळे अश्या बेजबाबदार अधिकार्याचा हलगर्जीपणा बाबत दि. १४ रोजी आरोग्य कर्मचार्यांनी बैठक घेऊन निषेध व्यक्त करून कर्मचार्यांना बैठकीस बोलावून स्वतःच हलगर्जी पण दाखवून अश्या किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार…? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. Www.navmaharashtranews.com

Posted from navmaharashtranews

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s