हरियाणातील रहीम समर्थकांच्या हिंसाचारात 32 ठार ; मोदींकडूनही निषेध

साध्वी बलात्कार प्रकरणी बाबा रहीमला सीबीआय कोर्टाने दोषी ठरवताच त्याच्या समर्थकांनी रहियाणात ठिकठिकाणी हिंसाचार सुरू केलाय. पंचकूला कोर्ट परिसर लष्कराच्या ताब्यात असूनही तिथंही जमावाने हल्ला चढवलाय. हायवे, रेल्वे स्टेशनवरही जाळपोळ करण्यात आलीय. न्यूज चॅनल्सच्या दोन ओबी व्हॅन्सही जाळण्यात आल्यात. सिरसा भागात न्यूज 18च्या प्रतिनिधींवरही बाबा रहीमच्या समर्थकांनी हल्ला केलाय. या हिंसाचारामुळे संतापलेल्या हायकोर्टाने बाबा रहीमची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत. बाबा रहिमच्या समर्थकांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 32 ठार, 250 जखमी झालेत. दिल्लीतही 10 ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याने, पोलिसांनी 11 झोन्समध्ये जमावबंदीचे आदेश दिलेत. दरम्यान, राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदींनीही या हिंसाचाराचा कठोर शब्दात निषेध करत लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय.
दरम्यान, बाबा रहीमला अटक झाल्यानंतर तात्काळ विशेष विमानाने रोहतकच्या जेलमध्ये हलवण्यात आलंय. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रूधुराची नळकांडी फोडण्यात आलीत. तणावग्रस्त भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. अनेक ठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आलीय तरीही बाबा समर्थकांचा हिंसक जमाव नियंत्रणात येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत. खबरदारी म्हणून लष्कराला पाचारण करूनही बाबा समर्थकांनी हरियाणात हिंसाचार घडवून आणला आहे. यामुळे रहियाणातील भाजपच्या खट्टर सरकारचं अपयश पुन्हा चव्हाट्यावर आलंय. हरियाणात जमावबंदीचे आदेश असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाबा रहीमचे समर्थक एवढा हिंसाचार करूच कसा शकतात, असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय.

​राजीनाम्याचे केवळ नाटक!

​राजीनाम्याचे केवळ नाटक!

राधाकृष्ण विखे यांची टीका
उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचे राजीनामे फेटाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, पत सावरण्यासाठी शिवसेनेने उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याचे नाटक रचल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर प्रकाश मेहतांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देसाईंचा राजीनामा फेटाळल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोन्ही मंत्र्याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर देसाई आणि मेहता यांनी आपले राजीनामे देण्याची तयारी दाखविली. मात्र मुख्यंत्र्यांनी त्यांचे राजीनामे फेटाळले. त्यांच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केली आहे. विरोधी पक्षांनी पुराव्यांसह आरोप करून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यास साफ नकार देत यापूर्वीच्या सरकारच्या काळातच गैरव्यवहार झाल्याचे सांगून उद्योगमंत्र्यांनी स्वत:चा केविलवाणा बचाव केला. देसाई यांना त्यांच्या विभागात यापूर्वी गैरव्यवहार झाल्याचे माहिती होते तर तीन र्वष ते झोपले होते का, असा सवाल करून राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिवसेनेमध्ये नैतिकता असती तर तातडीने उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता. परंतु त्यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत कानावर हात ठेवले आणि आता जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.