वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या मतीन सय्यदला अटक

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणारा औरंगाबाद महानगरपालिकेतील नगरसेवक सय्यद मतीन याला शुक्रवारी मारहाण करण्यात आली होती. यानंतर मतीन याच्या समर्थकांनी महापालिकेच्या परिसरात प्रचंड धिंगाणा घातला होता. याप्रकरणी शनिवारी पोलिसांकडून मतीन याला अटक करण्यात आली.

महापालिकेच्या विशेष सभेत शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडला. मात्र, सय्यद मतीन याने त्याला विरोध करत आरडाओरड सुरु केली. ते ऐकताच उपमहापौर विजय औताडेंसर इतर संतप्त नगरसेवक मतीन याच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी मतीन यांना मारहाण करत सभागृबाहेर पिटाळून लावले.

यानंतर सय्यद च्या समर्थकांनी महापालिकेबाहेरही धिंगाणा घातला. त्यांनी अनेक गाड्यांची तोडफोड केली.भाजप नगरसेवकांकडून ‘प्रसाद’ मिळूनही मतीन याचा उन्माद कमी झाला नाही. उलट त्याने व्हिडीओ प्रसिद्ध करून ‘हो, मी केला विरोध’ अशी उद्दाम भाषा तर केलीच पण ‘मी एकटा होतो, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’, अशी दर्पोक्तीही केली होती. तक्रार उपमहापौर विजय औताडे यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी या प्रकरणाचा तपास करून सय्यद मतीन यास अटक केली.

यानंतर सय्यद मतीन याचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तसेच मतीन याला भविष्यात महापालिकेत येण्यास बंदी घालत असल्याचे आदेशही काढण्यात आले आहेत.सय्यद मतीन याने महापालिकेत जो प्रकार केलाय त्याच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचा खुलासा एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय.

नालासोपा-यात वैभव राऊत समर्थकांचा मोर्चा

दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वैभव राऊत यांना अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी स्थानिकांकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्थानिकांनी एटीएसच्या कारवाईचा निषेध केला.

वैभव ज्या परीसरात राहतात त्यांच्या भंडार आळी परीसरातील लोकांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चात अनेक हिंदू संघटनांनीही सहभाग घेतला. भंडार आळी परिसरातून निघालेल्या या मोर्चाची सांगता नालासोपारा बस स्थानकात झाली.

वैभवना या प्रकारनात नाहक फसवल्याचा आरोप संतप्त गावकऱ्यांनी केला. हे आंदोलन असंच सुरु राहणार असून आंदोलन ते आणखीन तीव्र करु अशा इशाराही स्थानिकांनी दिला. वैभव हे गोरक्षकाचे काम करत होते. त्यामुळे त्यांना या प्रकरात नाहक फसवल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.

हे हि वाचा

एटीएसच्या तपासाला वेग;तिघांची कसून चौकशी,आणखी महत्वाचे धागेदोरे मिळाले

वाजपेयींच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट दरम्यान हा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास होता. प्रकृती अस्वास्थामुळे गेले ९ आठवडे दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी ( आज ) संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे एम्सच्या डॉक्टरांनी जाहीर केले. शुक्रवारी ( उद्या ) संध्याकाळी राजघाटावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी ६ ते ९ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार्थिव भाजपच्या केंद्रीय कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरूवात करण्यात येईल.

अटबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर भारतीय राजकारणातील भीष्मपितामह हरपला अशी प्रतिक्रिया सर्व क्षेत्रातून येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. गानकोकीळा लता मंगेशकर यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील अटलबिहारी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

अजातशत्रु व्यक्तिमत्व

राजकारणातील अजातशत्रु व्यक्तिमत्व म्हणजे अचलबिहारी वाजपेयी. कवी, पत्रकार, राजकारणी असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पोखरण अणुचाचणी, लाहोर बस सेवा, काश्मीर प्रश्नी संवादाची भूमिका, संसदेवरील हल्ला, कंदार विमान अपहरण आणि कारगिल युद्ध यासारख्या अनेक घटना या अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घडल्या. या प्रत्येक समस्येला अटलबिहारी वाजपेयी यांनी तितक्याच तडफेने उत्तर दिले.

भाजपाला पराभव दिसू लागल्यानेच ‘वन नेशन वन इलेक्शन’चे खूळ-राज ठाकरे

भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागला आहे त्यामुळेच लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका घेण्याचे खूळ सरकारच्या डोक्यात आल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपा आता निवडून येणार नाही याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती वाटते आहे त्याचमुळे एकत्र निवडणुकांचा घाट घातला जातो आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. याच पत्रकार परिषदेत पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाचाही उल्लेख त्यांनी केला. मी जे बोललो ते १९६० पासून सुरू आहे. अजित पवारांनी ते मनाला लावून का घेतलं? माहित नाही मात्र अजित पवारांनी ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज्यात १ लाख २० हजार विहिरी लोक सहभागातून बांधण्यात आल्याची माहिती समोर आली, असे असेल तर सरकारी अधिकारी काय करत आहेत? ते आमिर खानसाठी काम करत आहेत का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सध्या देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ची चर्चा चांगलीच रंगली आहे. एककीडे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रक्रियेसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल असे म्हटले आहे. अशात याच मुद्द्यावरून मोदींना पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच वन नेशन वन इलेक्शनचा घाट घातला जातोय अशी टीका राज ठाकरेंनी केली.

एटीएसच्या तपासाला वेग;तिघांची कसून चौकशी,आणखी महत्वाचे धागेदोरे मिळाले

नालासोपारामधून हिंदू जनजागृती यांचा साधक वैभव राऊत घरातून हस्तगत केलेल्या बॉम्ब आणि साहित्यानंतर एकूण तिघा जणांना अटक करण्यात आली होती, यामध्ये शरद कळसकर आणि सुधनवा गोंधलेकर यांचा समावेश होता. वैभव राऊत आणि शरद कळसकर हे दोघे हिंदू जनजगृती समितीचे माजी कार्यकर्ते असल्याचे दावा केला जातोय तर गोंधलेकर हा शिवप्रतिष्ठानशी संलग्न असल्याची माहिती मिळाली आहे. तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आता एटीएसला महत्वाची माहिती मिळाली असून त्यांच्या तपासला वेग आलेला आहे.आणि सुधनावा गोंधलेकर याच्या चौकशीतून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसला आणखी काही महत्वच्या हत्यारे आणि स्फोटक जप्त करण्यात यश आलेले आहे. वैभव राऊत यांच्या घरी आणि गोदामात टाकलेल्या धाडीमध्ये 20 गावठी बॉम्ब आणि 22 प्रकारचे बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे 50 बॉम्ब बनतील इतके साहित्य एटीएसच्या हाती लागले होते.

गोंधळेकर याच्या चौकशीनंतर त्याच्याकडून 10 गावठी पिस्तुल आणि मॅगझीन्स, एक एअरगन, 10 पिस्तुलचे बॅरल, सहा पिस्तुल मॅगझीन्स, सहा अर्धवट पिस्तुलचे भाग, 3 अर्धवट मॅगझीन, सहा अर्धवट बनवलेले पिस्तुल स्लाईड, सहा रिले,एक ट्रिगर, तीन 9 व्होल्ट च्या बॅटरी, वेगवेगळ्या लांबीच्या चोपर, स्टीलचा चाकु, काही फायरआर्म्स, बॅटरीस, हातमोजे, ड्रिल करण्याची मशीन चे साहित्य, टूलकिट,6 वाहनांच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट, हार्डडिस्क, पेंनड्राईव्ह, स्फोटक बनवण्याचे बुक्स, रिले स्वीचेसचे सर्किट डायग्रम, आणि काही स्फोटक बनवण्यासाची माहिती असणारी पुस्तके आणि मोबाईल चे स्वीच असा साठा जप्त करण्यात आला आहे.तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एटीएसला महत्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत. यामुळे चौकशीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आतापर्यंत 13 ते 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे. सनातन संस्थेचा वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधनावा गोंधळेकर यांच्यात फोनवरून संपर्क असल्याचे समोर आलेले आहे. तर पेशाने व्यावसायिक असणाऱ्या सुधनवा गोंधळेकर याच्या घरातून एवढा मोठा साठा जप्त केल्यानंतर नक्की काय घातपात केला जाणार होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान तीनही आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी त्यांच्या चौकशीतून वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. आज संशयित म्हणून पुण्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांनाच सनातन आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर येत असल्याने आता हिंदूत्ववादी संघटना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एटीएसची शोधमोहीम राज्यभर सुरू असून दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये सुद्धा काही सनातन संघटनेच्या आरोपींचा समावेश असल्याने आता या प्रकारणाशी काही जोड आहे का हे सुद्धा पाहिले जाणार आहे.

यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण

१५ आँगस्टपासून चूलबंद आंदोलनाचा इशारा

पुणेयापुढे रस्त्यावर आंदोलन नाही तर साखळी उपोषण करण्यात येईल अशी घोषणा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली. तोडफोड करणारे मराठा आंदोलक नसून मराठा समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. १५ ऑगस्टपासून आम्ही चूलबंद करुन अन्नत्याग आंदोलन करू.

आंदोलनात बाह्यशक्ती शिरल्या
मराठा मोर्चाने 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान जी तोडफोड झाली ती, मराठा आंदोलनात घुसलेल्या बाह्यशक्तीमुळे झाली, मराठा समाजातील बांधवांनी केलेली नाही, असा दावा मराठा समन्वय समितीने पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
आंदोलनात बाह्य शक्ती शिरल्या आहेत, त्या हिंसा करत असल्याचे मराठा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले. हिंसक घटनेचा आम्ही निषेध करतो आणि हिंसा करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही असे यावेळी समन्वयकांनी सांगितले.तोडफोड करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते, काल झालेल्या बंदलाऔरंगाबाद, पुणे अशा ठिकाणी हिंसक वळण लागले.मराठा समाजातील बांधवांनी हिंसेचा अवलंब केला नसून विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही समितीने केला. आम्ही सर्वांना पोटतिडकीने शांततेचं आवाहन करत होतो, मात्र दुपारनंतर तोडफोड झाली. तोडफोड करणारे कोण हे पोलिस तपासात समोर येईल, झाल्या प्रकाराबद्दल पुणे मराठा मोर्चा माफी मागतो, असंही समन्वयकांनी सांगितलं.
वळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप

कश्मीरच्या बंदीपुरात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर मीरा रोड येथील वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘शहीद मेजर कौस्तुभ राणे अमर रहे’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत हजारोंनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या जवानांनी बंदुकीतून २१ गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी दिल्यानंतर राणे यांचे वडील प्रकाश आणि मुलगा अगस्त्य यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा उपस्थितांना अश्रू अनावर झाले. सकाळी ६ वाजता शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून मीरा रोड येथील हिरल बिल्डिंग या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सकाळी ७ वाजल्यापासून ९.३० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव सोसायटीच्या आवारात दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी हजारोंनी गर्दी करून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, कपिल पाटील, नरेंद्र मेहता यांच्यासह लोकप्रतिनिधींनी शहीद कौस्तुभ राणे यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

• बहिणीने चितेवर ठेवले घड्याळ आणि कॅडबरी

कौस्तुभ यांची बहीण कश्यपी हिने दादासाठी एक घड्याळ भेट म्हणून घेतले होते. तो घरी आला की ही भेट ती त्याला देणार होती, पण घरी आले ते कौस्तुभ यांचे पार्थिव. त्यांच्या चितेला अग्नी देण्यापूर्वी कश्यपी हिने ते घड्याळ व त्याला आवडणारी कॅडबरी त्यांच्या पार्थिवाशेजारी ठेवली. हे दृश्य पाहून उपस्थितांना हुंदके अनावर झाले.लष्कराच्या जवानांनी हार, फुलांनी सजवलेल्या ट्रकवर त्यांचे पार्थिव असलेली शवपेटी खांद्यावरून नेऊन ठेवली. यावेळी कौस्तुभ यांची पत्नी कनिता, वडील प्रकाश, आई ज्योती, बहीण कश्यपी यांच्यासह उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. ट्रकवर लष्कराचे अधिकारी तिरंगा फडकवत होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर मीरा-भाईंदरकरांनी फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती.

  • स्मशानभूमीत प्रचंड गर्दी

अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली तेव्हा गर्दीला आवरणे कठीण झाले. राणे यांच्या कुटुंबीयांनी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यानंतर जमाव शांत झाला. कौस्तुभ यांच्या संपूर्ण कुटुंबाने पुढे येऊन पुष्पचक्र अर्पण केले. त्यांची पत्नी कनिता यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी दोन वर्षांच्या चिमुकल्या अगस्त्यचा माथा कौस्तुभ यांच्या पार्थिवावर टेकवला. वीरमाता ज्योती यांचा आक्रोश हेलावून टाकणारा होता.

  • कौस्तुभ यांची पत्नी कनिता, वडील प्रकाश, आई ज्योती, बहीण कश्यपी यांच्यासह उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.
  • लष्कराच्या जवानांनी बंदुकीतून २१ गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी दिली.

हिना गावित हल्ला प्रकरण चार जणांवर ऍट्रॉसिटी दाखल

नंदुरबारच्या भाजपा खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धुळ्यामध्ये रविवारी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला केला होता. हल्ला झाला त्यावेळी गावित या स्वतः गाडीत होत्या. त्यानंतर हे प्रकरण थेट लोकसभेत गेले आणि स्वत: हिना गावित यांनी या प्रकरणात हल्लेखोरांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी लोकसभेत बोलताना केली होती. तसंच एखाद्या महिलेला सुरक्षा देता येत नसेल तर तेथील पोलीस अधिकार्‍याची बदली करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर तातडीने कारवाई करत संध्याकाळीच धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली होती.
यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजातील प्रतिनिधींनी हिना गावित यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे. यावेळी बोलताना मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडत घडलेला प्रकार अनावधानाने घडल्याचे सांगत कोणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचेही सांगितले. आम्ही छत्रपतीच्या शिवरायांच्या विचारांचे आहोत. परस्त्रीचा सन्मान केला पाहिजे. तिला माता भगिनी समान मानलं पाहिजे. कोणत्याही महिलेविरुद्ध मराठा समाजातील कोणताही कार्यकर्ता अशा प्रकारे कृत्य करणार नाही, ज्यामुळे त्या महिलेला त्रास होईल किंवा तिला वेदना होईल किंवा तिच्या जिवाला धोका पोहचेल. आमच्या मनात कोणाबद्दल काहीही नव्हते असे स्पष्टीकरण मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या हल्ल्याबद्दल बोलताना दिले.

Continue reading “हिना गावित हल्ला प्रकरण चार जणांवर ऍट्रॉसिटी दाखल”

उद्या महाराष्ट्र बंद

उद्या महाराष्ट्र बंद ; मराठा संघटनांचा एल्गार

ठाणे:
आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मराठा आंदोलनाला दोन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे.
मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला उद्याच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, राज्यात गेल्या २१ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. त्यामुळे उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आधीच राज्यसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने उद्याच्या बंदमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
दरम्यान, उद्या होणारा बंद शांततेत पार पाडण्याचं आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी केलं आहे. आंदोलनावेळी कोणतीही हिंसा होणार नाही, मात्र आंदोलनावेळी आम्ही सरकारशी असहकार करू, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
‘उद्या बंद असल्याने मुंबईत कर्फ्यू सदृश्य परिस्थिती असणार आहे. कडकडीत बंद पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल पंपापासून मॉलपर्यंत आणि रिक्षापासून ते बसेसपर्यंत सर्व वाहतूक बंद असेल, असे मेसेज सध्या सोशल मीडियावरून फिरवले जात आहेत. एवढंच नव्हे तर नागरिकांनी आजच सर्व आवश्यक वस्तूंची खरेदी करावी, अशा सूचनाही मेसेजवरून दिल्या जात आहेत. हे सर्व मेसेज खोटे असून उद्या मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू राहील,’ असं सकल मराठा समाजानं स्पष्ट केलं आहे. ‘मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीतील बंदबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका’, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

मरीना बीचवर होणार करुणानिधींच्या पार्थिवाचं दफन, मद्रास हायकोर्टाचा निर्णय

तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद पाचवेळा भूषवणारे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते तसंच द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी निधन झाले. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार असून शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आहे. याआधी अभिनेता रजनीकांत, कमला हासन यांनीदेखील अंत्यदर्शन घेतलं.

दरम्यान करुणानिधींची समाधी मरीना बीचवरच होणार आहे. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर मद्रास उच्च न्यायालायने हा निर्णय दिला. राज्य सरकारने नकार दिल्याने हा वाद न्यायालयात गेला होता. न्यायालयाने निर्णय देताच समर्थकांच्या भावना अनावर झाल्या.