एटीएसच्या तपासाला वेग;तिघांची कसून चौकशी,आणखी महत्वाचे धागेदोरे मिळाले

नालासोपारामधून हिंदू जनजागृती यांचा साधक वैभव राऊत घरातून हस्तगत केलेल्या बॉम्ब आणि साहित्यानंतर एकूण तिघा जणांना अटक करण्यात आली होती, यामध्ये शरद कळसकर आणि सुधनवा गोंधलेकर यांचा समावेश होता. वैभव राऊत आणि शरद कळसकर हे दोघे हिंदू जनजगृती समितीचे माजी कार्यकर्ते असल्याचे दावा केला जातोय तर गोंधलेकर हा शिवप्रतिष्ठानशी संलग्न असल्याची माहिती मिळाली आहे. तिघांनाही ताब्यात घेतल्यानंतर आता एटीएसला महत्वाची माहिती मिळाली असून त्यांच्या तपासला वेग आलेला आहे.आणि सुधनावा गोंधलेकर याच्या चौकशीतून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसला आणखी काही महत्वच्या हत्यारे आणि स्फोटक जप्त करण्यात यश आलेले आहे. वैभव राऊत यांच्या घरी आणि गोदामात टाकलेल्या धाडीमध्ये 20 गावठी बॉम्ब आणि 22 प्रकारचे बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे 50 बॉम्ब बनतील इतके साहित्य एटीएसच्या हाती लागले होते.

गोंधळेकर याच्या चौकशीनंतर त्याच्याकडून 10 गावठी पिस्तुल आणि मॅगझीन्स, एक एअरगन, 10 पिस्तुलचे बॅरल, सहा पिस्तुल मॅगझीन्स, सहा अर्धवट पिस्तुलचे भाग, 3 अर्धवट मॅगझीन, सहा अर्धवट बनवलेले पिस्तुल स्लाईड, सहा रिले,एक ट्रिगर, तीन 9 व्होल्ट च्या बॅटरी, वेगवेगळ्या लांबीच्या चोपर, स्टीलचा चाकु, काही फायरआर्म्स, बॅटरीस, हातमोजे, ड्रिल करण्याची मशीन चे साहित्य, टूलकिट,6 वाहनांच्या वेगवेगळ्या नंबरप्लेट, हार्डडिस्क, पेंनड्राईव्ह, स्फोटक बनवण्याचे बुक्स, रिले स्वीचेसचे सर्किट डायग्रम, आणि काही स्फोटक बनवण्यासाची माहिती असणारी पुस्तके आणि मोबाईल चे स्वीच असा साठा जप्त करण्यात आला आहे.तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर एटीएसला महत्वाचे धागेदोरे हाती लागत आहेत. यामुळे चौकशीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आतापर्यंत 13 ते 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे. सनातन संस्थेचा वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधनावा गोंधळेकर यांच्यात फोनवरून संपर्क असल्याचे समोर आलेले आहे. तर पेशाने व्यावसायिक असणाऱ्या सुधनवा गोंधळेकर याच्या घरातून एवढा मोठा साठा जप्त केल्यानंतर नक्की काय घातपात केला जाणार होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान तीनही आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी त्यांच्या चौकशीतून वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत. आज संशयित म्हणून पुण्यातून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सगळ्यांनाच सनातन आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचे समोर येत असल्याने आता हिंदूत्ववादी संघटना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. एटीएसची शोधमोहीम राज्यभर सुरू असून दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये सुद्धा काही सनातन संघटनेच्या आरोपींचा समावेश असल्याने आता या प्रकारणाशी काही जोड आहे का हे सुद्धा पाहिले जाणार आहे.