मोदींना आता कोणत्या चौकात शिक्षा द्यायची; लोकांनी ठरवावे – राज ठाकरे

आरबीआयच्या अहवालातून नोटबंदीचा निर्णय फसला हे समोर आले आहे. त्यामुळे लोकांनीच मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहीजे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. दोन वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला फक्त ५० दिवस द्या आणि मग बघा काय होतं ते? ५० दिवसानंतर माझा निर्णय चुकला तर मग तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे मोदींनी सांगितले होते. हाच धागा पकडत ठाकरे यांनी मोदींवर निशाना साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या संघटनबांधणीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले की, नेपाळमध्ये थापा आहेत म्हणून मोदी तिकडे गेले असावेत.