तुकाराम मुंढेंच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव बारगळला!


नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मागे घेण्यात आला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा विषय चर्चेत होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भाजपाच्या नगरसेवंकांनी मुंढेंविरोधातला हा अविश्वास प्रस्ताव मागे घेतला आहे. शनिवार १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेतील हा अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यात आल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर भाजपा नगरसेवक नरमल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येत हा अविश्वास प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव महापौर रंजना भानसी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तुकारम मुंढेंच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या अविश्वास प्रस्तावाला समर्थन दिलं होतं.