मराठा समाजासाठी नवा राजकीय पक्ष

पुणे – मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडविण्याच्या हेतूने स्वराज्य क्रांती पक्ष या नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी ही घोषणा केली. मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे, शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमीभाव मिळवून देणे, महिलांना ५० टक्के आरक्षण देणे यांसह विविध उद्दिष्टे पक्षाने आपल्यापुढे ठेवली असल्याचे या वेळी सांगण्यात आले.