महात्मा फुलेंचे स्मारक व ओबीसी आरक्षणासाठी सावता परिषद करणार ‘राज्यस्तरीय धरणे सत्याग्रह’-कल्याण आखाडे

जालना प्रतिनिधी : महात्मा ज्योतीराव फुले यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे व ओबीसी आरक्षण अबाधीत रहावे यासह अन्य मागण्यासाठी महात्मा फुले स्मृतीदिन औचित्यावर बुधवार दि28 नोव्हे.2018 रोजी सावता परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विविध जिल्हात राज्यव्यापी धरणे सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक अरबी सुमुद्रात साकारत आहे.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ईंदु मिल च्या ठिकाणी होत आहेच तसेच साता समुद्रापलीकडे ब्रिटन मध्ये ही झाले आहे.शिवाजी महाजांना आपले गुरू मानणारे व बाबासाहेबांनी गुरू मानलेले महात्मा फुले यांचे ही स्मारक त्याच धरतीवर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निर्माण करावे.मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षण अबाधीत रहावे यासह फुले दाम्पत्याचा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा,महिला व बहुजनांच्या शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले यांचा जन्मदिन (जयंती) “शिक्षण दिन” म्हणुन पाळण्यात यावा, सावित्रीमाई फुलेंचे जन्मगाव नायगाव जि.सातारा येथे सावित्री सृष्टी निर्माण करावी,मुलींची पहिली शाळा सुरु झालेल्या पुणे येथील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषित करावे व स्थगित करण्यात आलेली मेगा नोकर भरती तातडीने करून बेरोजगार युवकांना न्याय द्यावा.या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार आहे.

तरी या आंदोलनामध्ये जिल्हातील सावता परिषदेचे तमाम सावता सैनिक,माळी समाज बांधव,ओबीसीतील समाज संघटनांचे पदाधिकारी, फुले-शाहु-आंबेडकर विचारधारेचे अनुयायी,युवक-महिला वर्ग आदिने संपूर्ण राज्यभरातील आपआपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि.28नोव्हे.2018 रोजी सकाळी 11 ते दुपारी 02 या दरम्यान होत असलेल्या धरणे आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी होऊन जबाबदारी निभवावी,आपले योगदान द्यावे असे अवाहन सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी कळविले आहे केले आहे. स्मृतीदिनानिमित्त आंदोलन स्थळी महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात येणार आहे