महिला काँग्रेसच्या महासचिव पदी अप्सरा रेड्डी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा रेड्डी यांना अखिल भारतीय महिला काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव म्हणून नियुक्त केले आहे. त्या पहिल्या ट्रांन्सजेंडर आहेत ज्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव असतील.

राहुल गांधी आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुष्मिता देव यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.

आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील अप्सरा रेड्डी यांचे शालेय शिक्षण चेन्नईमध्ये झाले. त्यानंतर, त्यांनी ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून पत्रकारितेतून पदवी प्राप्त केली. महाविद्यालयापासूनच त्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी ट्रान्सजेंडर आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी देखील काम केले.

त्यानंतर त्यांनी लंडनमधून पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला आणि देशाच्या माध्यमिक संस्थांमध्येही काम केले.

जयललितांसोबत अप्सरा रेड्डी
एआयएडीएमके प्रवक्ता देखील
अप्सरा एआयएडीएमकच्या प्रवक्तेही होत्या, पण तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिताच्या मृत्यूनंतर त्यांनी पक्ष सोडला. त्या म्हणाल्या की त्या वेळी पक्षात संघर्ष झाला होता आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा पराभव झाला होता.
व त्याचवेळी त्या भाजपातदेखील सामील झाल्या पण काही काळानंतर त्यांनी पक्ष सोडला.
अप्सरा यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर सांगितले की, काँग्रेस पक्षाचे लोक त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहेत कारण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तरुण आहेत ते दूरदृष्टिचे आहे.
अप्सरा म्हणाल्या की, राहुल गांधी यांचे वर्तन पक्षातील महिलांच्या बरोबर सभ्य आहे. समाजकारण आणि राजकारणात भाग घेण्याकरिता आपले काम महत्वाचे आहे, लैंगिक नाही.अप्सरा यांचे जीवन खूप कठीण परिस्थितीतून गेले आहे, लोकांनी त्यांचा मजाक उडवला, पण त्या नेहमी मजबूत मनाने शांत राहिल्या आणि आपले लक्ष फक्त आपल्या ध्येयावर ठेवले.