‘कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही’- चंद्रकांतदादा पाटील

पंढरपूर : चंद्रकांत पाटील कार्तिक एकादशीच्या महापूजेसाठी आज (7 नोव्हेंबर) संध्याकाळी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यातील जनतेनं विधानसभा निवडणुकीनंतर जनादेश दिला आहे. असं असतानाही सरकार स्थापन होत नाही याचं दुःख आहे. मात्र, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर देखील टीका केली जाते, याचे दुःख भाजपला आहे.” यातून पाटील यांनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेवरील आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Navmaharashtra News
Navmaharashtra News

‘कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही’

कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे नेते आमच्यासोबत आले आहेत ते फक्त विकासाची दूरदृष्टी ठेवून आले. भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

‘या गोष्टीचं दुःख’

विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने जनादेश देऊनही अद्याप राज्यात सरकार स्थापन होत नाही याचं दुःख असल्याची भावनाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात राष्ट्रपती शासन येणार असल्याचं बोललं जात आहे.

निसर्गाचं बदललेलं चक्र पुर्ववत व्हावं आणि संकटामागून येणाऱ्या संकटातून बळीराजा आणि राज्यातील जनतेला सावरण्याची शक्ती दे असं साकडं महापूजेनंतर विठ्ठलाला घालणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या दृष्टीकोनातून राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर बोलणं टाळलं. शिवसेनेची भूमिका कायम असताना उद्या (8 नोव्हेंबर) शपथविधी होणार का या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं. त्यामुळे 9 नोव्हेंबरपर्यंत सरकार अस्तित्वात न आल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? असाच संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचं बोललं जात आहे.

जनादेश महायुतीलाच;राज्यपालांची घेणार भेट-सुधीर मुनगंटीवार

%243%6%%%6%

images (37)

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले आहे. “आमचा फॉर्म्युला ठरला आहे. जी नाराजी आहे. ती दूर होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे सरकार आमचंच येणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांची भेट घेणार आहोत,” अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल आठवडा उलटला आहे. दिवाळीनंतर सरकार स्थापन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी ताणून धरली. तर मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही, अशी भूमिका भाजपानं घेतल्यानं चर्चा फिस्कटत गेली. त्यामुळं सरकार युतीचं येणार की नाही असा प्रश्न राजकीय वर्तुळात चघळला जात होता. त्यात आम्ही मुख्यमंत्री पदावर ठाम असून, सत्तेच्या समसमान वाटपाशिवाय चर्चा नाही, असं शिवसेनेकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, सरकार महायुतीचं येणार असं सांगत भाजपानं गौप्यस्फोट केला आहे.

“राज्यातील निवडणुकांवरही बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवरही चर्चा करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील निवडीचा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्षांचीही निवड करण्यात येणार आहे. तसेच ९१ हजार ३७० बुथ अध्यक्षांच्या नेमणूक करण्यात येणार,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सरकार स्थापन करण्याविषयी मुनगंटीवार म्हणाले, “जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. आम्ही भूमिकेशी ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल. मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या (गुरूवारी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहोत. आमचा फॉर्म्युला ठरला असून, योग्य वेळी सांगितला जाईल. जी नाराजी आहे. ती दूर केली. अंधेरा ढलेगा, उजाला आयेगा,” असं सांगत मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला.