खानापूर तालुक्यातील युवकाची चाकूने भोसकून हत्या

खानापूर तालुक्यातील युवकाची हत्या
murder

सांगली :- खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावानजिक व्यावसायिक तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ओढ्याजवळ एक तरुण गंभीर जखमी आवस्थेत सापडला. बालाजी किसन कारंडे ( वय 27, रा. सागर भेंडवडे ) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्यानंतर ही खूनाची घटना असल्याने उघडकीस आले.

साळशिंगे गावच्या परिसरातील ओढ्याजवळ एक तरुण गाडीवरून पडून गंभीर जखमी झाल्याची माहिती ग‘ामस्थांना एका प्रवासी महिलेने दिली. भेंडवडे मधील ग‘ामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे हा तरूण रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्याला विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ग‘ामीण रूग्णालयात करांडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या उजव्या काखेत खोलवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला असल्याचे उघडकीस आले. बालाजी याचे विटा येथे खानापूर रस्त्यावर साई मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. त्याच्या खूनाचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद विटा पोलीसात झाली आहे.