कोल्हापूर पोलीस आणि आंतरराज्य टोळीत गोळीबार,तिघे गंभीर.

Navmaharashtra News

कोल्हापूर पोलीस आणि गुन्हेगारांच्या टोळीमध्ये धुमश्चक्री झाल्याची घटना समोर आली आहे.  पुणे-बंगळुरु महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये गोळीबार झाला आहे. यावेळी एकमेकांवर झालेल्या बेछूट गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तसंच या चकमकीत दोन आरोपी जखमी झाले आहेत.  याप्रकरणी जखमींसह तीन आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Navmaharashtra News

मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार,  ही सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे.  राजस्थान पोलिसांना चकवा देत सराईत गुन्हेगार दोन दिवसापूर्वी धारवाडमध्ये आले होते आणि याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोल्हापूरातील किणी टोल नाक्याजवळ सापळा रचण्यात आला होता. दरम्यान या गुन्हेगारांवर वेगवेगळ्या प्रकरणी तब्बल 25 गुन्हे राजस्थान पोलिसात दाखल आहेत.

मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास हे आरोपी किनी टोल नाक्यावर पोहोचले. गुन्हेगारांच्या गाडीला रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार करण्यास सुरूवात केली. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार सुरू केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.  यापैकी एकाला पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यात श्यामलाल गोवर्धन बिष्णोई (रा. जोहापूर, राजस्थान), सरवन मनोहरलाल बिष्णोई (२४) हे दोघे गँगस्टर गंभीर जखमी झाले.  या प्रकरणातील तिन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. 

या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. टोलनाक्यावर अशा प्रकारे गोळीबार झाल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली. 

सुबोध भावे साकारणार शरद पवारांची भूमिका?

मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायची इच्छा बोलून दाखवली. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सुबोध भावेने शरद पवारांची भेट घेतली. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला. सुबोधने आतापर्यंत लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर यांचे बायोपिक केले.

सुबोधने याआधीही पवारांची भूमिका साकारायची इच्छा व्यक्त केली होती. ‘मनात काय चाललंय हे तुम्हाला काहीच कळू द्यायचं नाही. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांनी जेवढं बघितलंय तेवढं आज राजकारणात कोणीच पाहिलेलं नाही,’ असं तो म्हणाला होता. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक आल्यास त्यांच्या भूमिकेत सुबोध भावेला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

सुबोध सध्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो  ‘AB आणि CD’ या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबक काम करणार आहे. सोशल मीडियावर बिग बींसोबतचा फोटो शेअर करत सुबोधने स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त केली होती.

जाहिरातीसाठी संपर्क navmahanews@gmail.com

नाशिकमध्ये अपघात, बस आणि रिक्षा विहिरीत कोसळली,

नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेशी फाट्याजवळ हा अपघात झाला. बस आणि रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. यावेळी आधी रिक्षा आणि नंतर बस कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी जागीच ठार झाले. तर बसमधील तीन प्रवासी ठार असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघात होताच समोरील हॉटेलवर थांबलेले देवळा रहिवासी असलेले शिक्षक संजय सदिशिव देवरे व शेतमालक गणेश देवरे यांनी बसमधील जखमींना तातडीने बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यासह पोलीस यंत्रणा व रुग्ण वाहिका तातडीने घटना स्थळी हजर झाल्या. आमदारांनीही स्थानिकांची मदत घेऊन मृतांना बाहेर काढलं.

धनगर समाजासाठी मोदी घेणार ऐतिहासिक निर्णय,आरक्षणाचा वाद मिटणार

ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये अनेक जातीत मूळाक्षरामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे अनेक अतिमागास वर्गाला शासकीय लाभ मिळत नाही. धनगर आणि धनगड यासारख्या जातीतील वाद सोडविण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसी आयोगाला मुदत वाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे अशी माहितीकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलीय.केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या  बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देण्याकरिता शास्त्री भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ओबीसी समाजातील विवध जातींचा अभ्यास करून एक केंद्रीय यादी निश्चित करण्याकरिता आयोग कार्यरत आहे. राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत या आयोगाची स्थापना कधी झाली आहे. गेल्या 02 ऑक्टोबर 2017 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये आयोगाची स्थापना कधी झाली होती.

आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती जी रोहिणी यांची नियुक्ती करण्यात आली होती देशभरातील सर्व ओबीसी जातींचा अभ्यास करून एक ओबीसी संदर्भात केंद्रीय सूची तयार करायची असा उद्देश आयोगाचा होता. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षापासून धनगर आणि धनगड या मध्ये वाद आहे.

धनगर समाजाला यामुळे अनेक शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे असा दावा समाजाचे नेते करीत आहे त्यामुळे या आयोगाच्या माध्यमातून हा वाद सोडवण्याचा  प्रयत्न करण्यात येणार आहे. होत आहे.

ओबीसी आयोगाच्या सर्व शिफारशी आगामी 31 जुलै 2020 पर्यंत केंद्र सरकारला द्यावे अशा सूचना केंद्र सरकारच्या वतीने आयोगाला करण्यात आलेली आहेत. इंग्रजी मुळाक्षरांमध्ये जाती लिहिल्यामुळे

इंग्रजांच्या काळामध्ये अनेक जातींमध्ये नावांच्या  त्रुटी निर्माण झालेले आहेत या त्रुटी सोडविण्याची  जबाबदारी देखील आयोगाला देण्यात आलेली आहे  त्यामुळे आयोग काय शिफारसी करते  याच्या आधारावर  केंद्र सरकारला अतिमागास ओबीसी वर्गासाठी निर्णय घेता येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आरक्षणाची मागणी करत आहे जर धनगर समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा अहवाल आवश्यक आहे धनगर समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावा अशीही मागणी करण्यात येत आहे त्यामुळे या माध्यमातून कुठेतरी धनगर समाजाला न्याय देता येईल का याचीही तपासणी केली जात आहे.

देशातील अनेक राज्यात हा वाद उफाळून आलेला आहे त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता लगावला आहे.  ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असणाऱ्या टीकेला उदयनराजेंनी उत्तर दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदींशी करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाश काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पार पडले. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी शिवाजींच्या वंशजांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी आज (मंगळवारी) पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

बुद्धी गहाण ठेवली आहे का?

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा मला प्रश्न पडतो. या पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मी या कुटुंबामध्ये जन्माला आलो, मी या वंशाचा भाग आहे मला याचा अभिमान आहे. महाराजांबद्दल कोणीही उठसूट यायचं आणि काहीही बोलायचं असं चालणार नाही,” असं उदयनराजे म्हणाले.

“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असे उदयनराजे म्हणाले.

प्रायव्हेट कंपनीकडून फसवणूक,जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर प्राणघातक हल्ला

Navmaharashtra News

पुणे: लकी ड्रा चे अमिष दाखवून सामान्य जनतेला आपल्या कंपनीत बोलावून लाखो रुपयांची गुंतवणूक करायला अनेक प्रायव्हेट कंपन्या सांगत असतात.या आमिषाला अनेक सामान्य नागरिक बळी पडतात.पुणे-मुंबई सह अशा अनेक कंपन्या विविध शहरात आहेत.सूट-बोट कोट परिधान केलेली ही मंडळी शहरात कंपनी उभी करून टूर अँड ट्रॅव्हल्स च्या नावाखाली पैसे गुंतवायला सांगून फसवणूक करीत असतात.असाच प्रकार पिंपरी-चिंचवड मधील रोयरा कार्पोरेट कंपनीबाबत घडला आहे.पिंपरी चिंचवड मधील स्टार बझार च्या बाहेर काही महिला या कंपनीच्या लकी ड्रा चे फॉर्म भरून घेत असताना सदर ठिकाणी पत्रकार कल्पेश परमार मॉल मधून खरेदी करून परतत असताना नको म्हणत असतानाही लकी ड्रॉ चा फॉर्म या महिलांनी भरून घेतला.दुसऱ्या दिवसापासूनच परमार यांना आपण लकी ड्रॉ साठी सिलेक्ट झाल्याचे सांगत मागच्या ८-१० दिवसापासून फोन,संदेश सदर कंपनीकडून येत होते.नेमका प्रकार काय हे पाहण्यासाठी परमार आणि त्यांचे सहकारी कंपनीत गेल्यानंतर टूर आणि ट्रॅव्हल्स बाबत माहिती देऊन लाखो रुपये गुंतविण्यासाठी सांगत होते.परमार यांनी आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचा लाभ घ्यायचा नसल्याचे सांगितले.घडलेल्या प्रकारानंतर दोन दिवसांनी दि.८/१/२०२० रोजी परमार,त्यांचे सहकारी पत्रकार आकाश भोसले,सामाजिक संस्था चालवत असलेल्या महिला अध्यक्षा कंपनीबाबत आणि लकी ड्रॉ च्या नावाखाली करीत असलेल्या फसवणुकीबाबत माहिती विचारण्यासाठी गेले असता त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली.पत्रकार भोसले यांनी सदर कंपनीच्या बाहेर वार्तांकन करण्यास सुरुवात केल्यानंतर सदर कंपनीचे गुंड प्रवृत्तीच्या डायरेक्टर आणि सहकाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यावेळी धारदार शस्त्राने जीवे मारण्याच्या उद्देशाने परमार यांच्या डोक्यात दुखापत केली.यावेळी संस्थेच्या महिला अध्यक्षा यांनी मारहाण करू नका,असे म्हंटल्याने त्यांनाही शिवीगाळ करत विनयभंग करण्यात आला.घडलेल्या प्रकारानंतर सदर ठिकाणावरून पत्रकार भोसले यांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून सुटका झाली.यानंतर वाय सी एम हॉस्पिटल ला उपचार घेतल्यानंतर कंपनीचे डायरेक्टर आणि त्यांच्या अन्य ७-८ सहकाऱ्यांवर पिंपरी पोलीस ठाण्यात कलम ३२४,३५४,१४१,१४३,१४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कंपनीच्या एका इसमास पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, उत्कर्षा देशमुख करीत आहेत.

JNU बनतंय ‘राजकारणाचा आखाडा’

Navmaharashtra News

जेएनयूमध्ये हिंसा भडकवून राजकारणाची बाजारपेठ तापली होती. यासह देशभरातील विविध विद्यापीठांमधील गुंडांनी ते हिंसा पेटवून स्वतःच्या भाकरी भाजण्यास सुरुवात केली. जामिया मिलिया इस्लामिया, कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठ, वाराणसीचेBHU, RTM नागपूर विद्यापीठ अशा अनेक संस्थांमध्ये निदर्शने सुरू झाली.

एवढेच नव्हे तर देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन केले. ज्यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यावेळी काश्मीरच्या स्वातंत्र्याशी संबंधित पोस्टर्सनीही गदारोळ निर्माण करण्यास सुरवात केली. ज्यामध्ये Free Kashmir लिहिले गेले होते. त्याच वेळी, Jnu हिंसाचारामुळे गुजरातमधील अहमदाबादमध्ये एबीव्हीपी(ABVP) आणि एनएसयूआयचे(NSUI) विद्यार्थी भिडले. या दोघांमध्ये हिंसक भांडण दिसले. अहमदाबादच्या पलाडी भागात मध्यम रस्त्यावर ABVP आणि एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केला, दगड आणि काठ्या-दांडके वापरले.

परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला. याशिवाय ग्वाल्हेरमध्येही डाव्या विद्यार्थी संघटनेचे DSO आणि ABVP चे विद्यार्थी आपसात भिडले. जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध डीएसओचे (DSO) विद्यार्थी करत होते, त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. वादाचे प्रमाण वाढता पाहून विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले, पण तोपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये भांडण चालू होते.

जेएनयूमध्ये अभ्यास करण्याऐवजी आजकाल राजकारणाचा बाजार वाढत आहे. देशाची बदनामी करण्यासाठी काही डाव्या गुंडांनी बर्‍याच काळापासून राजकीय तळांमध्ये रूपांतर करण्यास सुरवात केली होती. वेळोवेळी हे प्रकरण इतका अडकते की त्याद्वारे संपूर्ण देशाची व्यवस्था चिंतेत आहे.

गेल्या 10 वर्षात अनेक वेळा अशी प्रकरणे पाहिली गेली.

२०१० – राजस्थानमधील दंतेवाडा येथे सैनिकांचा शहिददिन साजरा केला जातोे तेव्हा

ऑक्टोबर २०११ – येथे महिषासुर दिन साजरा करताना आई दुर्गाविरूद्ध शिवीगाळ केली गेली

26 जानेवारी 2015 – प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने काश्मीरने भारतापेक्षा वेगळा देश दाखविला

फेब्रुवारी २०१८ – ‘अफझल आम्हाला लाज वाटली, तुमचा मारेकरी जिवंत आहे’, ( ‘अफजल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं’) टुकडे-टुकडे गैगने या घोषणा दिल्या.

11 नोव्हेंबर 2019 – विद्यार्थ्यांनी महिला प्राध्यापकाशी गैरवर्तन करुन बंधक बनविण्याचा प्रयत्न केला

14 नोव्हेंबर 2019 – स्वामी विवेकानंदांचा अपमान

जेएनयू हिंसाचारात दिल्ली पोलिसांना महत्त्वपूर्ण संकेत सापडले आहेत. डाव्या आणि एबीव्हीपी या दोघांनीही बाहेरील लोकांना बोलावले होते. आता दिल्ली पोलिस Face Recognisation तंत्राचा वापर करून मुखवटा घातलेले ओळखतील. प्रशासन ब्लॉकच्या 100 मीटरच्या आत कोणत्याही प्रकारची कामगिरी करण्यास मनाई आहे, तर मग Exam Registration थांबवण्यात का आले. सर्व्हर डाउन का होता? कारण त्यांच्या राजकारणाचे दुकान सजवण्यासाठी गुंडांना गदारोळ करायला व प्रकरण वाढवायला लागले.हे स्पष्ट आहे की जेएनयूला राजकीय क्षेत्रात रूपांतर करून देशभरातील विद्यार्थी मोदी सरकारच्या विरोधात असल्यासारखे वातावरण तयार केले जात आहे.

JNU हल्ल्याची जबाबदारी ‘हिंदू रक्षा दल’ या संघटनेनं स्वीकारली

Navmaharashtra News

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी हल्ला करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आता या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या संघटनेनं स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर उर्फ पिंकी चौधरीने एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हिंदू रक्षा दलाचा अध्यक्ष असून हा हल्ला आपणच केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Navmaharashtra News

जेएनयूमध्ये रविवारी जो हल्ला करण्यात आला त्यामध्ये हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते असा दावा चौधरीकडून करण्यात आला आहे. पिंकी चौधरीच्या विरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याला आमद आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला केल्या प्रकरणी तुरुंगातही जावं लागलं होतं.

चौधरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारखी होईल. जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आमच्या धर्माविरुद्ध एवढं चुकीचं बोलणं अयोग्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयु हा ड्याव्यांचा अड्डा आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला.

राज ठाकरे हिंदुत्ववादी भूमिकेत, पक्षाचा ध्वज बदलणार

PicsArt_01-06-06.34.33

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल.

मुंबई : राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता भगवी होणार असल्याची चर्चा आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा तब्बल 14 वर्षांनी बदलण्याची शक्यता आहे. मनसेच्या झेंड्यात मध्यभागी भगवा (अधिक प्रमाणात) तर वरच्या बाजूला निळा तर खालील बाजूस हिरवा रंग आहे. मनसेचा हा झेंडा आता बदलणार आहे. मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचे इंजिन) नसेल.

मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे हिंदुत्वाच्या मार्गावर राहणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत. कदाचित शिवसेना ही धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्तेत गेल्याने हिंदुत्त्ववादी मतांना आकर्षित करण्यासाठी आणि शिवसेनेची कट्टर हिंदुत्वाची जागा भरुन काढण्यासाठी हा बदल केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसे हा पक्ष स्थापन होऊन आता 14 वर्ष झाली आहेत. परंतु या 14 वर्षांमध्ये मनसेच्या वाट्याला यशापेक्षा अपयशाचे झेंडेच हाती घ्यावे लागले आहेत. 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेनं 13 आमदार निवडून आणले. नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई महापालिकांमध्येही मनसेला मोठं यश मिळालं. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला. परंतु त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांचे दारुण पराभव झाले.

2014 नंतर पक्ष अजूनच अपयशी ठरु लागला. 2014 साली तर राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. याच वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत मनसेला केवळ एकच आमदार निवडून आणता आला. मुंबई महापालिकेमध्ये तर राज ठाकरे यांच्या पक्षाचा केवळ एकच नगरसेवक आहे. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यापैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मनसेचा केवळ एक नगरसेवक शिल्लक आहे. 2012 मध्ये मुंबई महापालिकेत मनसेचे 28 नगरसेवक होते.

पाच वर्ष मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती. (2012 मध्ये नाशिकमध्ये मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले होते.) परंतु नाशिक महापालिकाही मनसेच्या हातून निसटली. (2017 च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले.)

सततच्या अपयशामुळे मनसेच्या विचारधारेमध्ये फोकस नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कधी मराठी माणसांसाठी, कधी हिंदूंसाठी, तर कधी सर्वांसाठीच मनसे धावून गेली. परंतु कोणताही एक समाज मनसेचा होऊ शकला नाही. त्यामुळे राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याचे बोलले जात आहे.

मनसेच्या झेंड्याच्या रंगांमध्ये पक्षाची सर्वसमावेशकता दडली होती. पण सध्याच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात एकगठ्ठा मतदानाला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना ही आघाडीच्या वळचणीला गेल्याने कट्टर हिंदुत्ववादी मतदारांना पर्याय हवा आहे. तोच पर्याय बनण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत का? हे 23 तारखेलाच कळेल, कारण 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी मनसे त्यांच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता

PicsArt_01-02-05.21.37.jpgकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीने भाजपच्या अडीच वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या अरुण इंगवले यांचा पराभव केला. अरुण इंगवले यांना 24 तर बजरंग पाटील यांना 41 मतं मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

जिल्हा परिषदेतील या निकालामुळे भाजप कोल्हापुरातून हद्दपार झाली आहे. कारण कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही. शिवाय दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. याशिवाय महापालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. केवळ कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. मात्र अडीच वर्षात ती सत्ता सुद्धा हातातून निसटली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडीने एकत्र येऊन कोल्हापूर झेडपीतील भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला होता. त्यामध्ये त्यांना यश आलं. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानंतर आता अडीच वर्षे विरोधात राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने सत्ता काबीज करण्याची तयारी केली होती. तर दुसऱ्या बाजूला भाजपने स्थानिक आघाड्यांना एकत्र करत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.

महाविकास आघाडीमुळे भाजपला जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता टिकवणे प्रतिष्ठेचे बनले होते. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली होती. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला सोबत घेण्याची रणनीती आखली. त्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी प्रदेश पातळीवरून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे एक तारखेला आम्ही बहुमताच्या पुढे असू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता. अखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीने भाजपची सत्ता उलथवून लावली आहे.

कधीकाळी एखादा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाजपला अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 67 पैकी तब्बल 14 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसलाही या निवडणुकीत 14 जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी बरोबरच स्थानिक आघाड्यांना एकत्र घेण्यात काँग्रेस मागे पडली आणि इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच  इतर स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन भाजपने 34 आकडा गाठून आपलं बहुमत सिद्ध केलं आणि अध्यक्षपदाची माळ भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्या गळ्यात पडली होती. मात्र शैमिका महाडिक या अडीच वर्षेच अध्यक्षपदी राहिल्या.