‘राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खूष केले,तेच तुमच्यावर थुंकले’

निलेश राणेंचे रामदास कदम यांच्यावर ट्विटर वर टीकास्त्र

PicsArt_01-01-02.16.42

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांसह एकून 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र यामध्ये अनेक निष्ठावंतांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. ते सर्व नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये रामदास कदमही शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी टीका केली आहे.

रामदास कदमांविषयी बोलताना निलेश राणे म्हणाले की, ‘रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्तावर निलेश राणेंनी तिखट शब्दात टीका केली.

निलेश राणे म्हणाले की, ‘रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे.’

PicsArt_01-01-02.16.03

दरम्यान मंत्रिपदांवरुन शिवसेनेच्या नेत्यांच्या मनात खदखद असल्याचे वृत्त आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात यंदा अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. ठाकरेंनी शंकरराव गडाख व बच्चू कडू या दोन सहकारी पक्षांच्या आमदारांना शिवसेनेच्या वाट्याची मंत्रिपदे दिली आहेत. तर प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले सुपुत्र आदित्य ठाकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदावर संधी दिली. अनेक उत्सुकांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने शिवसेनेचे अनेक नेते व आमदार विस्तारित मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित नव्हते.