JNU हल्ल्याची जबाबदारी ‘हिंदू रक्षा दल’ या संघटनेनं स्वीकारली

Navmaharashtra News

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी हल्ला करण्यात आला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. आता या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दल या संघटनेनं स्वीकारली आहे. या संघटनेचा नेता भुपेंद्रकुमार तोमर उर्फ पिंकी चौधरीने एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. हिंदू रक्षा दलाचा अध्यक्ष असून हा हल्ला आपणच केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Navmaharashtra News

जेएनयूमध्ये रविवारी जो हल्ला करण्यात आला त्यामध्ये हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते होते असा दावा चौधरीकडून करण्यात आला आहे. पिंकी चौधरीच्या विरोधात यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. त्याला आमद आदमी पार्टीच्या कार्यालयावर हल्ला केल्या प्रकरणी तुरुंगातही जावं लागलं होतं.

चौधरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘जे कोणी लोक देशविरोधी कारवाया करतील त्यांची अवस्था जेएनयूच्या विद्यार्थ्यांसारखी होईल. जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. आमच्या धर्माविरुद्ध एवढं चुकीचं बोलणं अयोग्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयु हा ड्याव्यांचा अड्डा आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला.