राष्ट्रवादीच्या माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

Navmaharashtra News

सांगली – खटाव ( तालुका पलूस ) येथील राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांच्यावर दोघा अज्ञात व्यक्तीनी प्राणघातक हल्ला केला आहे. हल्लेखोर मोटरसायकलवरुन पसार झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.खटाव -भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून आनंदराव पाटील हे परतत असताना साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला. पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे ते बंधू आहेत.