एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना जामीन मंजूर

Rahul Kulkarni osmanabad

एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे उस्मानाबाद प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी मंगळवारी रेल्वेसेवा सुरू होणार आहे असे वार्तांकन केल्यामुळेच वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय नागरिकांनी गर्दी केली होती हा आरोप ठेवत कुलकर्णी यांना वांद्रे पोलीसांनी त्यांना उस्मानाबाद येथून अटक केली होती.

आज कुलकर्णी यांना वांद्रे सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पंधरा हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.अँड्.सुबोध देसाई यांनी राहुल कुलकर्णी यांच्या वतीने काम पाहिले, सरकारी वकील व वांद्रे पोलिसांनी कुलकर्णी यांच्या चौकशी साठी पोलीस कस्टडीची मागणी केली होती न्यायालयाने ती फेटाळून कुलकर्णी यांना जामीन मंजूर केला आहे.

वांद्र्यात नेमकं काय घडलं?
कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलकर्णी यांच्या अटकेवरून देशभरातील ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम समूहांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अटक करण्यापूर्वी संपूर्ण चौकशी करणे गरजेचं होतं – भारतकुमार राऊत,ज्येष्ठ पत्रकार

कुलकर्णी यांना जामीन मिळाल्याने समाधान – संजय राऊत

पत्रकारांची मुस्कटदाबी करणारे निराधार आणि जुलमी कलमे रद्द करा अशी मागणी राज्यभरातील पत्रकार संघटनांकडून होत आहे.