कराडमधील महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

निकट सहवासित 43 वर्षीय महिला कोरोना बाधित ;
मृत 5 महिन्याच्या बालकासह 55 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
13 वर्षाच्या मुलाचा अहवाल अनिर्णित तर 10 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

Navmaharashtra News

सातारा दि. 23( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 43 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही 43 वर्षीय महिला कोरोना बाधित असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 14 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 8 व फलटण येथील 11 असे एकूण 55 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 13 वर्षीय मुलाचा अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.
दि. 22 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बाधीत रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून 10 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

शिवभोजनचे जेवण चांगले 5 रुपयात चांगली सोय

Shivbhojan Thali
Shivbhojan Thali

सांगली, : आजमितीस जिल्ह्यात 21 शिवभोजन केंद्राद्वारे 3 हजार थाळ्यांच्या वितरणाची परवानगी देण्यात आली आहे . या केंद्रांमधून 22 मार्च पासून आजअखेर पर्यंत जवळपास 55 हजार 72 इतक्या व्यक्तींना शिवभोजन याचा लाभ दिला आहे . फूड पॅकेट्स तयार करून त्याचे वितरण करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांचे रोजगार बंद आहेत. अशावेळी 5 रुपयात जेवण मिळत असल्याने गोरगरीब, कामगार, मजूर आदींना शिवभोजन केंद्रांचा चांगला आधार आहे. यातून लाभ घेणारे अनेक लाभार्थी यासाठी मनापासून धन्यवाद देत आहेत. शिवभोजनाचे लाभ घेणारे सांगली फळमार्केट येथील अरविंद बनसोडे, म्हणाले, लॉकडाऊन मुळे जेवणाची मोठी अडचणी झाली होती. शिवभोजन योजनेमुळे आम्हाला 5 रुपयात चांगले जेवण मिळत असून त्यामुळे आम्हाला फायदा होत आहे.
तर मार्केट यार्डातील हाळदीच्या दुकाना काम करणाऱ्या रेणूका संजय चव्हाण यांनीही लॉकडाऊनमुळे काम बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन या योजनेमुळे आम्हाला आधार मिळाला आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
00000