शिवभोजनचे जेवण चांगले 5 रुपयात चांगली सोय

Shivbhojan Thali
Shivbhojan Thali

सांगली, : आजमितीस जिल्ह्यात 21 शिवभोजन केंद्राद्वारे 3 हजार थाळ्यांच्या वितरणाची परवानगी देण्यात आली आहे . या केंद्रांमधून 22 मार्च पासून आजअखेर पर्यंत जवळपास 55 हजार 72 इतक्या व्यक्तींना शिवभोजन याचा लाभ दिला आहे . फूड पॅकेट्स तयार करून त्याचे वितरण करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
लॉकडाऊनच्या कालावधीत अनेकांचे रोजगार बंद आहेत. अशावेळी 5 रुपयात जेवण मिळत असल्याने गोरगरीब, कामगार, मजूर आदींना शिवभोजन केंद्रांचा चांगला आधार आहे. यातून लाभ घेणारे अनेक लाभार्थी यासाठी मनापासून धन्यवाद देत आहेत. शिवभोजनाचे लाभ घेणारे सांगली फळमार्केट येथील अरविंद बनसोडे, म्हणाले, लॉकडाऊन मुळे जेवणाची मोठी अडचणी झाली होती. शिवभोजन योजनेमुळे आम्हाला 5 रुपयात चांगले जेवण मिळत असून त्यामुळे आम्हाला फायदा होत आहे.
तर मार्केट यार्डातील हाळदीच्या दुकाना काम करणाऱ्या रेणूका संजय चव्हाण यांनीही लॉकडाऊनमुळे काम बंद असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. शासनाने सुरु केलेल्या शिवभोजन या योजनेमुळे आम्हाला आधार मिळाला आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
00000