परप्रांतीय मजूरांना लुटणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Corrupt Police

सांगली : कडेगांव एम आय डी सी येथील जिल्हा सीमेवर कडेगांव पोलिस ठाणे येथील पोलिस हवालदार संतोष वसंतराव पाटील गोरगरीब आणि परप्रांतीय लोकांना विनाकारण मारहाण करून मजुरांना लुटत होता. त्याच्यावर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.

परप्रांतीय मजूर चालत, मोटरसायकल,खासगी गाडीने आपल्या गावी जात आहेत त्यासाठी ते परवानगी घेऊन जात आहेत अशा मजूरांना जिल्हा सिमेवर अडवून त्यांना मारहाण करून त्याच्याजवळचे पैसे हिसकावून घेणारा भ्रष्ट पोलिस कर्मचारी संतोष पाटील याच्याबद्दल अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यासंबंधी अधीक्षकांनी कडेगाव पोलिस निरीक्षक विपिन हसबनीस यांच्याकडे अहवाल मागितला होता.दरम्यान याची दखल घेत पाटील याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

लाँकडाऊन मध्ये काही भ्रष्ट कर्मचारी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्या व्यापारी व नागरिकांना लुटण्याचा धंदा तेजीत होता, अवैध व्यवसाय हप्तेवसूलीवर खुलेआम सूरु आहेत अशातच पोलिसावर झालेल्या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.