टिक टॉकसह अन्य ५८ चिनी अॅपवर भारतात बंदी

टिक टॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलोसह 59 चिनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. माहिती प्रसारण खात्यानं आयटी ऍक्टच्या सेक्शन 69A अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. भारतातल्या कोट्यवधी इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचं माहिती प्रसारण खात्यानं म्हटलंय.

भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अॅपमुळे धोका असल्याचं भारत माहिती प्रसारण खात्याचं म्हणणं आहे. यामुळे भारताच्या सायबरस्पेसची सुरक्षा राखणं सोपं होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

टिकटॉक, पबजी, यूसी ब्राउजर आणि शेअरइट सारख्या ऍप्सचा यामध्ये समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेत बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी जारी केली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी

टिकटॉक

शेअरइट

क्वाई

यूसी ब्राऊजर

बैदू मॅप

शीन

क्लॅश ऑफ किंग्स

डीयू बॅटरी सेव्हर

हॅलो

लाइकी

यूकॅम मेकअप

मी कम्युनिटी

सीएम ब्राऊजर

व्हायरस क्लीनर

एपीयूएस ब्राऊजर

रोमवी

क्लब फॅक्टरी

न्यूजडॉग

ब्युटी प्लस

वीचॅट

यूसी न्यूज

क्यूक्यू मेल

वीबो

झेंडर

क्यूक्यू म्युझिक

क्यूक्यू न्यूजफीड

बिगो लाईव्ह

सेल्फी सिटी

मेल मास्टर

पॅरलल स्पेस

वीसिंक

इएस फाईल एक्सप्लोरर

व्हीवो व्हीडिओ – क्यू यू व्हीडिओ इंक

मेंतू

व्हीगो व्हीडिओ

मी व्हीडिओ कॉल – शाओमी

न्यू व्हीडिओ स्टेटस

डीयू रेकॉर्डर
व्हॉल्ट – हाईड
कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ
डीयू क्लीनर
डीयू ब्राऊजर
हागो प्ले वीथ न्यू फ्रेंड्स
कॅम स्कॅनर
क्लीन मास्टर – चीताह मोबाईल
वंडर कॅमेरा
फोटो वंडर
क्यूक्यू प्लेअर
वी मीट
स्वीट सेल्फी
बायडू ट्रान्सलेट
व्हीमेट
क्यूक्यू इंटरनॅशनल
सिक्युरिटी सेंटर
क्यूक्यू लॉन्चर
यू व्हीडिओ
व्ही फ्लाय स्टेटस व्हीडिओ
मोबाईल लिजंड्स
डीयू प्रायव्हसी

सरकारनं बंदी घातल्यामुळे आता ऍन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्ले स्टोरमधून हे अॅप्स भारतात हाटवले जातील.

दरम्यान भारत सरकारनं लोकांना या ऍप्सला अनइनस्टॉल करण्याचं आवाहन मात्र केलेलं नाही. त्यामुळे लोकांना त्यांची इच्छा असेपर्यंत हे त्यांच्या फोनमध्ये कायम राहू शकतील. त्यांना मॅन्युअली हटवल्यानंतरच ते जाऊ शकतील. पण लोकांना आता हे अॅप अपडेट करता येणार नाहीत.

पडळकर समर्थक विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात सोशल मीडिया युद्ध

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्राला लागलेला कोरोना अशी जोरदार टीका केली आणि काही वेळातच याचे पडसाद सोशल मिडियावर उमटायला लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी माध्यमांतर गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे त्यामध्ये नामदार जितेंद्र आव्हाड, नामदार धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, रूपाली चाकणकर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे आणि पडळकरांनी भान ठेवून बोलावे असा सल्ला दिला आहे त्याचबरोबर युवक राष्ट्रवादीने आमदार गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही, तोंडाला काळ फासण्याचा इशारा दिला आहे यावर पडळकर समर्थकही चांगलेच आक्रमक झाले आहेत जर गोपीचंद पडळकर यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्रातील तरुण व बहुजन समाज शांत बसणार नाही.

पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठिकठिकाणी निषेध केला जात आहे तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहन केले जात आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पडळकरांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

साताऱ्यामध्ये पुन्हा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’…… !!

कोरोना विषाणूच्या संकटामध्ये लॉकडाऊन झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन’साठी सज्ज झाली आहे. थांबलेल्या चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग आता पुन्हा सुरू होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने पुढाकार घेत जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी काही नियम आणि अटींसह चित्रीकरणास परवानगी दिली आहे. विशेष बाब म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री’ आणि ‘टोटल हूबलाक’ या दोन मालिकांच्या चित्रीकरणास प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे.
डोळे दिपवणारं सह्याद्रीचं विस्तीर्ण आणि दाट खोरं, निसर्गाने केलेली मुक्तहस्ताने उधळण, बाराही महिने संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ, शंभरहून अधिक हेमाडपंथी मंदिरे, नागमोडी रस्ते आणि दुतर्फा हिरवाईच सौंदर्य यामुळे सातारा हा चित्रपट सृष्टीसाठी पूर्वीपासूनच पोषक वातावरण असलेला जिल्हा. मुंबईमध्ये जे काही मिळत नाही आणि जे कृत्रिम पद्धतीने तयारही करता येत नाही ते सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीने भरभरुन दिल्यामुळे निसर्गतःच उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील विशेषतः पाटण, वाई, जावळी आणि महाबळेश्वर या तालुक्यांमधील काही ‘लोकेशन्स’ निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पाटणमधील कोयना धरण परिसर, नेहरू गार्डन, घाटमाथा, वनकुसवडे, खळे, बनपुरी आदी. महाबळेश्वरमधील अनेक पॉईंट्स, पाचगणी शहरामधील टेबललँड, शाळा, तापोळ्यामधील बोटिंग पॉईंट्स त्याचसोबत जावळीचे खोरं हे सुप्रसिद्ध आहे. तर ऐतिहासिक वाई शहर, धोम डॅम, मेनवली, वरखेडवाडी ही ठिकाण देखील पसंतीस उतरली आहेत.
जुन्या काळातील निर्माते आणि कलाकार तर आहेतच, परंतु अलीकडील काही वर्षांमधील प्रकाश झा, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर, अरबाज खान, प्रभुदेवा, महेश कोठारे, या दिग्दर्शकांचा साताऱ्याकडे विशेष ओढा आहे. सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा चित्रीत झालेल्या चित्रपटांची नाव न संपणारी आहेत. तर झी मराठी या वाहिनीवरील लागीर झालं जी, मिसेस मुख्यमंत्री, टोटल हूबलाक या मालिकांचे चित्रीकरण जिल्ह्यामध्ये झाले.
जिल्ह्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं हे क्षेत्र आहे. त्यात प्रामुख्याने शूटिंगसाठी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या पातळीवर तयार केलेली ‘एक खिडकी योजना’ ही निर्मात्यांना सोयीची वाटते. त्याचसोबत फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक, सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन, प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, स्थानिक डबिंग आर्टीस्ट, वॉटरबॉय या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार निर्मिती होते.
चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी, कलाकरांना दळण–वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था, सर्वांना जेवणासाठी सातारी केटरर्स या माध्यमांतुनही अनेक तरुणांच्या हाताला काम मिळते. ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे यामुळे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. त्याचसोबत चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये झालेली लक्षणील वाढ, अशा विविधांगी स्वरुपाचा फायदा जिल्ह्याला होतो.
*या नियम व अटींसहीत परवानगी.*● चित्रीकरण प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि पूर्ण शूटींग दरम्यान ग्लोज वापरणे बंधनकारक.
●चित्रीकरणाच्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे.
● हस्तांदोलन, मिठी मारणे अशा प्रकारची सर्व कृत्ये करणेस मनाई.
● दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी एक मीटर अंतर.
●65 वर्षावरील व्यक्तींना चित्रीकरण प्रक्रियेत समाविष्ट करणेस मनाई.
●चित्रीकरण दरम्यान लग्न समारंभ, पुजा, सण, उत्सव, सामुहिक नृत्ये अशा गोष्टी करण्यास मज्जाव.
●केश रचना व मेकअपसाठी डिस्पोजेबल वस्तु वापरणे.
●चित्रीकरणाचे ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर, यांची प्रवेशद्वारावर व्यवस्था बंधनकारक.
●चित्रीकरण दरम्यान वापरात येणारे सर्व साहित्य उदा. – कॅमेरा, रिमोट, लाईट स्विच, स्क्रिप्ट पॅड, माईक, इलेक्ट्रिक सिस्टम इ. सर्व साहित्य वापरापूर्वी व वापरानंतर सॅनिटाईज करणे बंधनकारक.जिल्ह्याने देखील चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, गायक, वादक, लेखक यांच्या रुपाने हिरे दिले. यामध्ये सिनेअभिनेते सयाजी शिंदे, किरण माने, श्वेता शिंदे तसेच नवोदित कलाकार सागर कारंडे, संतोष साळुंखे आहेत. पटकथा लेखक प्रताप गंगवणे, अरुण गोडबोले, तेजपाल वाघ हे मान्यवर देखील याच मातीने दिले.
वास्तविक सातारा सांगली आणि कोल्हापूर ही पूर्वीपासून मराठी-हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाचे केंद्र होते. याच ठिकाणी बहुतेक चित्रपटांचे चित्रीकरण केले जाई. ऐतिहासिक चित्रपटांसाठी लागणारी भरपूर लोकेशन्स, ग्रामीण संस्कृती या ठिकाणी आहे. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राचा लढ्यामुळे एकीकडे राज्यांच्या अस्मितांना खतपाणी मिळत गेले. सोबत नव्याने काही प्रश्न उभे राहिले. आजुबाजूच्या लोकेशन्समध्ये अनेक समस्या किंवा म्हणावी तेवढी स्पेस, बघ्यांची गर्दी यामुळे आपसूकच चित्रीकरणासाठी पश्चिम महाराष्ट्र हे मुख्य केंद्र बनले. सद्य स्थितीतही कोरोनामुळे मुंबईमधील चित्रीकरण पूर्णतः बंद आहे. दूरचित्रवाणी वाहिन्या, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, छोटे-मोठे व्यवसायिक यांचा होत असलेला तोटा लक्षात घेऊन चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा या भागाकडे वळत आहे.चित्रीकरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचे मोठे क्षेत्र सातारा जिल्ह्यात आहे. कलाकार, शुटींग लोकेशन्स, हॉटेल्स, केटरिंग, वाहतूक व्यवसाय आणि त्याच्याशी जोडलेले अनेक व्यवसाय इथे आहेत. सध्या कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे हे क्षेत्र मोडकळीस आलेले आहे. असे असताना या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चित्रीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेऊन परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातीला हा पहिला निर्णय ठरला आहे. या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. अनेक चित्रपट निर्माते आता सातारची वाट धरत असल्याने इथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. कलाक्षेत्रातील हा सातारा पॅटर्न चित्रपट क्षेत्रातील सर्वांसाठी आशादायक ठरत आहे.
– *तेजपाल वाघ (पटकथाकार)*
होय, तुम्ही सातारा जिल्ह्यात कुठेही शूटिंग करू शकता. सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यासाठी परवानगी दिली आहे. केवळ आता चित्रपट-मालिका क्षेत्रातील सर्व निर्मिती संस्था आणि दिग्दर्शकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नुकतंच आम्ही ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण आम्ही सुरू केले आहे. तुम्हाला ही तुमच्या चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी मिळेल. लवकरात लवकर या आणि आता कास, ठोसेघर, बामणोलीच्या दर्याखोर्यांत तसेच माण खटावच्या माळरानांमध्ये पुन्हा एकदा आवाज घुमूद्यात : लाईट, कॅमेरा, अॅक्शन !!!

जशाच्या तसे उत्तर देण्यास सक्षम – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. तसंच आम्हाला डिवचलं तर आम्हीही जशास तसं उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं पंतप्रधानांनी ठणकावलं. कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसंच सर्व शहीद जवानांना दोन मिनिटं मौन बाळगून आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कायमच आमच्या शेजारील देशांसोबत सहकार्याची भावना ठेवली. त्यांच्या भल्यासाठी प्राथर्ना केली. आम्ही कधीच कोणत्या देशाला डिवचण्याचा प्रयत्न केला नाही. मतभेद कधीच वाद होऊ दिले नाहीत. भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत. भारत-चीन सीमेवरील झटापटीत शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही.”

“जेव्हा कधी संकटं आली आहेत, तेव्हा देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. त्याग आणि तितिक्षा आमच्या राजकीय चरित्राचा वाटा आहे. विक्रम आणि वीरताही देशाच्या चरित्राचा वाटा आहे. देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. याबाबत कुणाच्या मनातही जरासाही भ्रम किंवा संशय असायला नको. भारताला शांतता हवी आहे. पण भारताला डिवचल्यावर कोणत्याही परिस्थितीत उत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे. आमच्या शहीद वीर जवानांचा देशाला अभिमान आहे. शत्रूला मारता मारता जवान शहीद झाले,” असं पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेले किंवा जखमी झाले आहेत.

काय म्हणाले नितीन गडकरी सोनू सूदविषयी?

शिवसेनेने सोनू सूद यांच्यावर ‘भाजपाचे प्यादे’असा आरोप केला आहे याविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले,सोनू सूद यांनी नागपूर येथून इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले असले तरि त्यांचा आणि भाजपचा काहीच संबंध नाही सोनू हे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करत आहेत यावर राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही.

केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणार-नितीन गडकरी

Navmaharashtra News
“एमएसएमईचं अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे या क्षेत्रावर संकट आलं आहे. केंद्र सरकारनं सर्व क्षेत्रांना उभारी देण्यासाठी २० लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. यापैकी तीन लाख कोटी रूपयांचा फायदा एमएसएमई क्षेत्राला होणार आहे,” अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसंच पुढील पाच वर्षांमध्ये पाच कोटी नोकऱ्यांचं उद्दिष्ट्य ठेवण्यात आल्याचंही ते म्हणाले.

करोनामुळे नक्कीच एमएसएमई क्षेत्रासोबतच संपूर्ण उद्योग क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु याची एक सकारात्मक बाजू आहे,” असंही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी पीपीई किट्सवरही भाष्य केलं. “दोन महिन्यांपूर्वी आपण पीपीई किट्सचं उत्पादन करत नव्हतो. आपण चीनमधून पीपीई किट्स मागवले होते. परंतु आता देशात एका दिवसांत ३ लाख पीपीई किट्सचं उत्पादन करण्यात येत आहे. आता पीपीई किट्सच्या निर्यातीचा विचार सुरू आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

स्वदेशीला आत्मनिर्भर भारताशी जोडता येणार नाही

“स्वदेशीला आत्मनिर्भर भारताशी जोडता येणार नाही. भारत आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही आता आयात कमी करणार आहोत. तसंच निर्यातीला अधिक प्रोत्साहन देणार आहोत. करोना संकटाच्या काळात कोणीही निराश होऊ नये. सकारात्म विचारांना आपल्याला पुढे न्यायला हवं. विरोधी पक्षानंही स्थलांतरीत मजुरांवरून राजकारण करू नये,” असंही गडकरी म्हणाले.

धक्कादायक घटना! दोन वृद्ध भावांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा सख्ख्या भावांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय,एका आरोपीचे वय ६७ वर्षे असून दुसऱ्या आरोपीचे वय ६५ वर्षे आहे. सविस्तर माहिती अशी की शिवाजीनगर गावात शेजारी राहायला असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन ऊसाच्या शेतात आणि पत्र्याच्या शेडमध्ये बलात्कार केल्याची घटना घडलीय. पिडीत मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात, मुलीने बाबतची घटना घरी सांगितली असता आईवडिलांनी कडेगाव पोलीस ठाणे गाठले व सदर पुरूषांवर तक्रार दाखल केली,त्या दोन आरोपींवर पोक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे व आरोपींना अटक करण्यात आली आहे, या घटनेने जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे.

कोरोना योध्द्यांना मिळणार ५०लाखांचा विमा संरक्षण

मुंबई : कोरोनाविरुद्ध राज्य सरकारची लढाई सुरु आहे.आता कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचा विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हा शासननिर्णय राज्याच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमत्री अजित पवार यांनी दिली.

विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनानं दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना शासनाकडून ५० लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, बाह्यस्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारीवर्गाला ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणार्‍या संबंधित कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचे सर्व्हेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करुन कर्तव्य बजावत आहे. या कर्मचार्‍यांची सुरक्षा तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याबाबत राज्य शासन गंभीर असून त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आलाय, असे ते म्हणालेत.
आरोग्य सेवेच्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे. शुक्रवारच्या शासन निर्णयानुसार, कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी आदी सर्व घटकांना ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

भाजपाचे राम शिंदे बसलेत उपोषणाला,कारण…

अहमदनगर: कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने राम शिंदे यांनी उपोषण सुरू केले आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ मीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्री माथ्यावर कुकडी नदीचा उगम झाला आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत-वाहत घोडनदीला मिळते

दरम्यान, कुकडीचे पाणी हे शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील धरणातून जाते. मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मिळणारं हक्काच पाणी अद्याप मिळाले नाही.

उन्हाळा संपत आला तरी पाणी नाही. उन्हाळात पाणी मिळणे गरजेचे होते. पाणी असूनही सोडण्याबाबत कोणतेही नियोजन होत नाही. राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच प्रशासनाकडून देखील कसलाही संपर्क होत नसल्याने भाजपा नेते तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे.
कर्जत-जामखेड हे तालुके दुष्काळी भागात असल्याने या तालुक्याला कायम पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. राजकारणी मंडळी प्रत्येक निवडणुकीत याच कुकडीच्या पाण्यावर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. शेवटी निवडणुका संपल्या कीं या तालुक्यातील जनतेला पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागते हे देखील तितकेच खरे आहे.
महाविकास आघाडीचे किंग मेकर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील याचं कर्जत-जामखेड मतदारसंघात पाण्याचं राजकारण करत तालुक्यातील नागरिकांना आशेचा किरणं दाखविला. नागरिकांनी देखील नवा युवा चेहरा आपल्यासाठी जीवाचं रान करेल या आशेवर रोहित पवार यांना भरघोस मतांनी विजयी केले. पवारांनी देखील निवडूक प्रचारादरम्यान या तालुक्यात भासलेली पाण्याची तहान टँकरद्वारे भागविली आणि बारामती पॅटर्न वापरत भाजपाच्या नेत्याला धोबीपछाड देत कर्जत-जामखेड मतदारसंघ काबीज केला.
मात्र, आता पुन्हा कुकडीच्या पाण्यावरून राजकारण सुरू झालं असल्याने कर्जत-जामखेड आणि श्रीगोंदेकरांना त्यांना हक्काचे पाणी मिळणारं तरी कधी? हाच प्रश्न आता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

परिक्षांबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला निर्णय?

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. राज्यात अनलॉक १ ची नियमावली जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे.

नवमहाराष्ट्र न्यूज

राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेमिस्टरची सरासरी काढून विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.

जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे, तिथे त्या पद्धतीने का होईना, पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उपलब्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र पुढील काळात विभागाची स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असेही ते म्हणाले. सद्य:स्थितीत गुगल क्लासरूमचा वापर सुरू करण्यास त्यांनी मान्यता दिली.