गोदी कामगारांचे श्रद्धास्थान डॉ. शांती पटेल यांचा ९९ वा जयंतीदिन

Shanti Patelस्वातंत्र्यसेनानी, मुंबईचे माजी महापौर, ज्येष्ठ कामगार नेते स्व. डॉ. ,शांती पटेल यांचा 8 ऑगस्ट 2020 रोजी 99 वा जयंतीदिन आहे. सध्याच्या कोव्हीड 19 मूळे आपण कोणताही जाहीर कार्यक्रम करू शकत नाही, मात्र त्या दिवशी माझगाव येथील कामगार सदनमध्ये डॉ. शांती पटेलसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात येईल.
आपणांस माहीतच आहे की, डॉ. शांती पटेल यांनी विद्यार्थी दशेत असतानाच महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.गोदी कामगार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे, हे आपण गोदी कामगार कधीच विसरू शकत नाही. मुंबई पोर्ट ट्रस्टचे ते 62 वर्षे विश्वस्त होते. पोर्ट उद्योगातील हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. साहेब तुमची आज क्षणा क्षणाला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार यांना सातत्याने आठवण येते. तुमच्याजवळ देशहित, उद्योगहित व कामगारहीत याबाबत चांगला दूर दृष्टिकोन होता. संप कधी करायचा व कधी मागे घ्यायचा हे तंत्र तुम्हाला चांगले अवगत होते. तुमचा राजकारणातला अनुभव नेहमीच कामगारांच्या फायद्याचा ठरला. गोदी कामगारांच्या पगारवाढीची ज्या ज्या वेळेस मागणी असायची त्यावेळेस तुम्ही संबंधित मंत्रीमहोदयाना भेटून नेहमीच मार्ग काढीत होते, तुमच्या अनुभवामुळे व कामगार एकजुटीमुळे गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व पेन्शनवाढ मिळाली, हे गोदी कामगार कधीच विसरू शकत नाही. साहेब आज तुम्ही दिसत नसले तरी आमच्या हृदयात कायमस्वरूपी तुम्ही आहात. गोदी कामगार व कामगार चळवळीतील कामगार कार्यकर्ते आपणांस कधीच विसरू शकत नाही.
8 ऑगस्ट 2020 रोजी डॉ. शांती पटेलसाहेब यांची 99 वी जयंती आहे, त्यानिमित्त युनियनच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद व तमाम गोदी कामगारांतर्फे विनम्र अभिवादन.

आपला विश्वासू
सुधाकर अपराज
जनरल सेक्रेटरी
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

शिवभोजन नंतर आता भाजपाची दीनदयाळ थाळी

Navmaharashtra News

शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीनंतर आता भाजपाने आता दीनदयाळ थाळी चालू केली आहे. पंढरपूरमधून या दीनदयाळ थाळी योजनेची सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोळयासमोर ठेऊन या भाजपाने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे.

शिवभोजन थाळीच्या तुलनेत दीनदयाळ थाळीची किंमत थोडी जास्त आहे. पण या थाळीमध्ये १० पदार्थ आहेत. शिवभोजन थाळी १० रुपयांना तर, दीनदयाळ थाळी ३० रुपयांना आहे. शिवभोजन थाळीत भात, भाजी, वरण आणि पोळी असे चार पदार्थ दिले जातात.तर दीनदयाळ थाळीमध्ये तीन चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचे, कांदा लींबू याचा आस्वाद घेता येईल.विठ्ठल मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर इंदिरा गांधी भाजी मार्केटजवळ ही थाळी आजपासून सुरु झाली आहे.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते या थाळीचा शुभारंभ झाला. पंढरपूरातील एका महिला बचत गटाला सोबत घेऊन भाजपाने ही योजना सुरु केली आहे. दुपारी १२ ते एक या वेळेत ही थाळी सर्वांना दिली जाईल.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला ५१ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय वादात

Navmaharashtra News

महाराष्ट्र सरकारनं वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन दिलीय. शरद पवार हे या इन्स्टिट्युटचे विश्वस्त आहेत. शरद पवारांमुळेच सर्व नियम डावलून जमीन देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलाय.

“वसंतदादा शुगर इन्स्ट्युट संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव गेल्या 7 वर्षांपासून प्रलंबित आहे. याआधी महसूल, विधी आणि न्याय विभागानं यावर आक्षेप घेतला होता. हे आक्षेप धुडकावत सरकारनं निर्णय घेतला,” असा आरोप भंडारींचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपचा हा आरोप फेटाळला आहे. “वसंतदादा इन्स्टिट्युटला भाडेतत्वावर जमीन देण्यात आलीय, शरद पवारांना नाही. साखर उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ही संस्था काम करते. याचं राजकारण केलं जाऊ नये,” असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.

सेन्सेक्स कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.46 लाख कोटी रुपयांचे नुकसान

Navmaharashtra News

मुंबई विशेष प्रतिनिधी : शेअर बाजारांत गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, त्यांची अर्थसंकल्पातील घोषणांमुळे निराशा झाली. गुंतवणूकदारांवर विक्रीचा दबाव वाढला. व्यवहाराच्या अखेरच्या क्षणी सेन्सेक्स १,०९२.२५ अंक कोसळून ३९,६३१.२४ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सायंकाळी व्यवसायाच्या समात्तीवर हा ९८७.९६ अंक♦(२.४३%)वर बंद झाला. हा सेन्सेक्स आतापर्यंतच्या चौथ्या आणि १० वर्षांतील अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्वात मोठा घसरला.


याआधी सेन्सेक्स २४ ऑक्टोबर २००८ रोजी १०७०.६३ अंक घसरून ८७०१.०७ च्या स्तरावर बंद झाला होता. सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी वित्ती तुटीस जीडीपीच्या ३.३% पर्यंत मर्यादीत ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. सकाळी व्यवसायाच्या सुरुवातीनंतर बाजार मर्यादीत कक्षेत होता. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, की वित्तीय तूट जीडीपीच्या ३.८% पर्यंत पोहोचू शकतो. विक्रीचा दबाव सुरू झाला. याशिवाय प्राप्तिकराअंतर्गत सूट परत घेतल्यावर प्राप्तिकर स्लॅबच्या पर्यायी स्लॅबचा प्रस्ताव ठेवला.

डिव्हिडंड डिस्ट्रिब्यूशन टॅक्स जमा करण्याचा भार कंपन्यांवरील हटवून तो प्राप्त करणाऱ्यावर टाकला. सेन्सेक्सच्या धर्तीवर एनएसई निफ्टीत ३००.२५ अंका(२.५१% )ची घसरण पाहायला मिळाली. हा निर्देशांक ११,६६१.८५ च्या पातळीवर बंद झाला. बाजाराच्या या घसरणीत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मूल्य ३.४ लाख कोटीी रुपयांनी कमी झाले. व्यवसाय सत्राच्या समाप्तीत बीएसईचे बाजार भांडवल १५३.०५ लाख कोटी झाले. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण आयटीसीच्या समभागांत राहिली. ही ६.९७% घसरला.

गेल्या दहा वर्षांत बजेटच्या दिवशी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण नोंदली

> 26 फेब्रुवारी 2010 प्रणव मुखर्जी +175.35
> 28 फेब्रुवारी 2011 प्रणव मुखर्जी +122.49
> 16 मार्च 2012 प्रणव मुखर्जी -209.65
> 28 फेब्रुवारी 2013 पी. चिदंबरम -290.87
> 10 जुलै 2014 अरुण जेटली -72.06
> 28 फेब्रुवारी 2015 अरुण जेटली +141.38
> 29 फेब्रुवारी 2016 अरुण जेटली -152.30
> 1 फेब्रुवारी 2017 अरुण जेटली +485.68
> 1 फेब्रुवारी 2018 अरुण जेटली -58.36
> 1 फेब्रुवारी 2019 पीयूष गोयल +212.74
> 5 जुलै2019 निर्मला सीतारामण -394.67
> 1 फेब्रुवारी 2020 निर्मला सीतारामण -987.96

वित्तीय तूट वाढणे गुंतवणूकदारांसाठी नकारात्मक नाही

अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी अर्थसंकल्पातील अपेक्षा खूप वाढल्या आहेत. वित्तीय तूट वाढणे सकारात्मक आहे. येत्या वित्त वर्षात झाल्यास बाजाराचे मनोधैर्य आणखी वाढते. त्यामुळे बाजारात घसरण दिसली.


देशातील समभागधारकांकडून लाभांशावर करवसुली योग्य नाही

लाभांश वाटप कर हटवण्याचा प्रस्ताव विदेशी गुंतवणूकदारांसाठी चांगला आहे. मात्र, देशातील गुंतवणूकदारांना लाभांश याआधीच कंपनीद्वारे कंपनी कर चुकवल्यानंतर दिला जातो. समभागधारक कंपनीचे मालक असतात. अशात सरकार पुन्हा कर वसुली करत आहे.

महावितरणची वीजबिल वसुली ग्रामपंचायतींकडे !

Navmaharashtra News

वीज थकबाकीच्या मुद्दय़ासह उद्योगांसाठी स्वस्त वीज पुरविण्याबाबत नवीन ऊर्जा धोरणही तयार करण्यात येणार आहे.

महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीज देयक वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून, ग्रामीण भागात देयक वसुलीचे काम प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात येणार आहे. कृषीपंपांचे थकलेले वीज देयक वसूल करण्यासाठी ऊर्जामित्रांमार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृषी वीज थकबाकीच्या मुद्दय़ासह उद्योगांसाठी स्वस्त वीज पुरविण्याबाबत नवीन ऊर्जा धोरणही तयार करण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वीज देयक वसुलीसाठी खासगी कंपन्यांशी करार करून नियुक्ती केली जाते. त्या धर्तीवर राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये प्रत्येकी एका ग्रामपंचायतीकडे प्रायोगिक तत्त्वावर हे काम देण्याच्या सूचना राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

रिलायन्स इंडस्ट्रीज सुरू करणार डिजिटल कंपनी, अमेझॉन- फ्लिपकार्टला टक्कर देणार नवी योजना

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता दिग्गज ई-कॉर्मर्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. वृत्तानुसार, ते २४०० कोटी डॉलरची डिजिटल कंपनी सुरु करणार आहेत. देशाच्या इंटरनेट शॉपिंग क्षेत्रातील त्यांच्या साम्राज्याचा मार्ग ही कंपनी प्रशस्त करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (आरआयएल) मंडळांने पूर्ण मालकीच्या या सहायक कंपनीत १५०० कोटी डॉलर (सुमारे १.०८ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे. ही सहायक कंपनी रिलायन्स समुहातील रिलायन्स जिओ इन्फोकॉम या दुरसंचार कंपनी गुंतवणूक करणार आहे. योजनेनुसार या सहायक कंपनीतून जिओत भांडवलाचे हस्तांतरण अनेक टप्प्यांत होईल. अशारितीने मार्च २०२० पर्यंत जिओ पूर्णपणे कर्जमुक्त होईल. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. जिओवर सध्या सुमारे ८४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.


पत्रकानुसार, अलीबाबा ग्रुप होल्डिंग्ज लिमिटेड आणि अल्फाबेच इंक प्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीज पर्यायी रुपांतरित प्राधान्य समभागाच्या माध्यमातून या होल्डिंग गुंतवणूक करेल. पालक कंपनीकडून जिओमध्ये करण्यात आलेल्या ६५ हजार कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीचे अधिग्रहण ही होल्डिंग कंपनीकरेल. यामुळे स्पेक्ट्रमचे देणे वगळता जिओ कर्जमुक्त होईल. नवी सहायक कंपनी झाल्यामुळे रिलायन्सचा सर्व डिजिटल व्यवसाय आणि अॅप एका कंपनी अंतर्गत येईल. यात माय जिओ, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, िजओ न्यूज आणि जिओ सावन यासारख्या अॅपच्या समावेश आहे. याशिवाय हेल्थकेअर, शिक्षण यासारख्या क्षेत्रांत ही कंपनी तंत्राज्ञानाच्या आधारे काम सुरू ठेवेल. याच बरोबर पुढील पिढीचे तंत्र अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, व्हर्च्युअल आणि आगमेंटेड रियलिटी आदीवरही काम करेल.

डेटा – डिजिटल सेवा रिलायन्सचे वृद्धी क्षेत्र

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ९.०९ लाख कोटी रुपये आहे. सध्या ही कंपनी तेलपासून ते पेट्रोकेमिकलच्या व्यवसायात कार्यरत आहे. मात्र,डेटा आणि डिजिटल सेवा आगामी काळात रिलायन्स समुहाच्या विस्ताराचे क्षेत्र राहील असे संकेत नव्याने उचलेल्या पावलावरून दिसताहेत. ही कंपनी, अमेझॉन डॉट इन आणि वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्ट डॉट कॉम प्रमाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उभारणार आहे. रिटेलसह नवे व्यवसाय रिलायन्स समुहाच्या उत्पन्नात ३२ टक्के वाटा उचलत असल्याचे मुकेश अंबानी यांनी ऑगस्टमध्येत समभागधारकांना सांगितले होते.