पुणे

मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी रंगूनवाला डेंटल कॉलेजची जनजागृती मोहिम ,मशाल पदयात्रा

हेल्मेट धारक दुचाकी चालकांना दिली गुलाबपुष्पे !

पुणे :

पुण्यातील महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेज तर्फे आयोजित मुख कर्करोग जनजागृती मोहिम आणि हेल्मेट वापराविषयी मशाल पदयात्रा आज सकाळी आझम कॅम्पस ,सेव्हन लव्हज चौक,स्वारगेट मार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पर्यंत काढण्यात आली .

या पदयात्रे मध्ये विद्यार्थ्यांनी हेल्मेट धारक दुचाकी चालकांना गुलाबपुष्पे दिली तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना अपघाताच्या शस्त्रक्रियांचे फोटो दाखवले ! ‘ये पान हमे इस मोड पे ले आया ‘ हे मुख कर्करोगावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले .

हेल्मेट न वापरल्यामुळे होणाऱ्या अपघातात दात तुटणे ,जबडा फाटणे ,हनुवटी तुटणे याचे प्रमाण अधिक आहे . त्यात दंत चिकित्सकांना (मॅक्सीलोफेशियल सर्जन्स ) शस्त्रक्रिया कराव्या लागतात . त्यांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे पोस्टर घेऊन ,१०० डेंटिस्ट ,डेंटल विद्यार्थी ,या मशाल मिरवणुकीत सहभागी झाले .

डॉ. सायरस पुनावाला यांचे नोबेलसाठी नामांकन

जगभरातील 140 देशांमध्ये लस निर्यात करून बालकांसह दीड अब्ज लोकांचे प्राण वाचविण्याचे उल्लेखनीय कार्य करणाऱया डॉ. सायरस पुनावाला यांचे यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. या माध्यमातून नोबेलसाठी नामांकन होणारे ते पुण्यातील पहिलीच व्यक्ती ठरले आहेत.

अमेरिकेतील ‘मॅसेचुसेट्स मेडिकल स्कूल’कडून (बोस्टन) सिरम इन्स्टिटय़ूटच्या सायरस पुनावाला यांना ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’ पदवीने नुकतेच गौरविण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुनावाला यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमातच डॉ. सायरस पुनावाला यांची यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची माहिती रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ परवेज ग्रांट यांनी येथे दिली. उद्योजक अतुल चोरडिया, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी, संजय दत्त, अभिनेत्री मल्लिका शेरावत आदी उपस्थित होते. या वेळी पुनावाला यांनी आपले विचार मांडताना देवाचा आशीर्वाद लाभल्यामुळे आपण अनेक बालकांचे प्राण वाचवू शकलो, असे सांगितले.