गुजरातमधील बडोदे येथे काम सुरू असलेली तीन मजली इमारत मध्यरात्री कोसळल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील बडोद्यातील बावानानपूरा येथील मध्यरात्रीच्या सुमारास काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. माध्यमांनी दिलेल्या माहिनुसार स्थानिकांनी सांगितलं की, “सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” दरम्यान, सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळली आणि या घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला.
Tag: मराठी न्यूज
गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे हृदयविकाराने निधन
पुणे : संपूर्ण पुणे शहरामध्ये गोल्डमॅन अशी ख्याती असलेले उद्योजक सम्राट मोझे यांचे सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सम्राट मोझे यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला ३९वा वाढदिवस साजरा केला होता.
मनसेचे दिवंगत आमदार व गोल्डमॅन म्हणून ओळख असणारे रमेश वांजळे यांच्या नंतर अंगावर भरमसाट सोनं घालण्यासाठी सम्राट मोझे प्रसिद्ध होते. ते दररोज आपल्या अंगावर तब्ब्ल साडे आठ किलो सोनं घालत होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच सम्राट मोझे यांनी बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपली बदनामी केली जात असल्याची पोलिसांच्या सायबर सेलला तक्रार दिली होती.
सम्राट मोझे यांनी आपले लहानपण चिंचवड गावात व्यतीत केले, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते. त्यानंतर मोझे पुण्यात स्थायिक झाले. वडील रामभाऊ मोझे यांच्या राजकीय कारकीर्तिमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला होता.
अंगावर साडेआठ किलो सोनं घालून दिली होती राष्ट्रवादीची मुलाखात
सम्राट मोझे यांनी मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा सोन्याचा रेकॉर्ड ब्रेक केल्याचं बोललं जातं. मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घातल असत. पुण्यात राष्ट्रवादीकडून पुणे मनपा निवडणूक उमेदवारी मागण्यासाठी सम्राट मोझे यांनी चक्क अंगावर साडे आठ किलो सोनं घालून मुलाखात दिली होती. यापूर्वी अंगावर दोन किलो सोनं असलेल्या रमेश वांजळे यांना राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलं होतं. सम्राट पुण्याच्या संगमवाडीच्या प्रभाग क्रंमाक 13 मधून निवडणूक लढवणार होते. आपण केलेल्या सामाजिक कार्यामुळे अजित पवार हे आपल्यला पुणे महानगर पालिका निवडणुकीची तिकीट देणारच असा विश्वास सम्राट मोझे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.
युवकाची उकळत्या काहीलीत उडी मारून आत्महत्या
नवमहाराष्ट्र वेब टीम | कोल्हापूर
पालकरवाडी (ता. राधानगरी) येथील गुर्हाळघरातील उकळत्या रसाच्या काहिलीत उडी मारल्याने 95 टक्के होरपळलेल्या गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, करवीर) याचा मृत्यू झाला.
सीसीटीव्हीत प्रकार कैद
गौतम कांबळे हा चालत काहिलीपर्यंत आला. उकळत्या रसात त्याने स्वत:हून उडी घेतल्याचे चित्रीकरण येथील सीसीटीव्हीमध्ये झाले.
‘मॅगी’ नूडल्स पुन्हा संकटात!, शिशाच्या प्रमाणावरुन न्यायालयाचा सवाल
सुप्रीम कोर्टात नेस्ले कंपनीकडून दाखल झालेल्या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी सुरु झाली असून लहान मुलांना शिसेयुक्त मॅगी का खायला द्यावी ? असा प्रश्न कोर्टाने कंपनीला विचारला आहे. यावर शिशाचं प्रमाण दिलेल्या मानकांनुसारच असल्याचा दावा कंपनीच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
मॅगीमध्ये जास्त प्रमाणात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट सापडल्याप्रकरणी अयोग्य व्यापार पद्धती, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती या कारणास्तव नेस्ले कंपनीकडून केंद्र सरकारने 3 वर्षांपूर्वी 640 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. एखाद्या कंपनीविरोधात अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्राहकाने तक्रार केली तरच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा संबंध येतो, परंतु ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील कलमानुसार सरकारही एखाद्या कंपनीच्या उत्पादनाबाबत तक्रार नोंदवू शकते. सरकारने या कायद्याच्या कलम 12-1 डी अन्वये तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ होती.
या निर्णयाला नेस्लेकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती दिली होती. गेल्या 3 वर्षांपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होते. अखेर गुरुवारी या याचिकेवर न्या. धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
नेस्ले इंडियाच्या वतीने अभिषेक मनु संघवी यांनी बाजू मांडली. म्हैसुरू प्रयोगशाळेत दिलेल्या मॅगीच्या नमुन्यांमध्ये शिशाचे प्रमाण दिलेल्या मानकांनुसारच असल्याचे स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावर न्यायाधीश चंद्रचूड यांनी शिसेयुक्त मॅगी लहान मुलांना का द्यावी ? असा सवाल संघवी यांना केला. त्यावर शिशाचे प्रमाण दिलेल्या मानकांनुसार असल्याचे व अनेक पदार्थांमध्ये काही प्रमाणात शिसे आढळून येत असल्याचा दावा कोर्टात संघवी यांनी केला आहे.