विधानपरिषदेसाठी गोपीचंद पडळकरांच्या नावावर शिक्कामोर्तब

पडळकरांचा राजकीय वनवास संपणार
विधान परिषदेसाठी भाजपने त्यांच्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून त्यात पडळकर यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा, भाजपकडून बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणारे पडळकर आता विधान परिषदेवर आमदार म्हणून जाणार हे निश्‍चित झाले आहे. धडाडी, जिद्द, चिकाटी आणि वक्तृत्वाचे कौशल्य या जोरावर त्यांनी मारलेली धडाडी लक्षवेधी मानली जातेय.

भाजपचे भविष्यातील राजकारण डोळ्यासमोर ठेवून युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचे धोरण आखले आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी गोपीचंद पडळकर यांचे नाव आघाडीवर होते. ते “रासप’मधून भाजपात आले. लोकसभेला उमेदवारी न मिळाल्यामुळे ते वंचित बहुजन आघाडीतून लढले. त्यांनी तब्बल तीन लाखाहून अधिक मते घेतली. त्यानंतर पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी असल्याने त्यांच्या सूचनेनुसारच त्यांनी विधानसभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविरोधात बारामतीमधून लढत दिली. बारामतीत त्यांचा पराभव दिसत असतानाही वरिष्ठांचा आदेश आणि भविष्यातील वाटचाल समोर ठेवून मैदानात उतरले.

पडळकर यांचे संघटन राज्यभर आहे. तसेच बहुजन आणि धनगर समाजाचे सध्या ते लोकप्रिय नेते आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भाजपच्या वरिष्ठांनी पडळकर यांच्या नावाला विधान परिषदेसाठी सहमती दिल्याचे सांगितले जात आहे. भाजपमधून गोपीचंद पडळकर यांचे नावावर विधान परिषदेसाठी शिक्कामोर्तब झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

पडळकरांना आमदार करा, कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र
खंबाळे (ता. खानापूर) येथील निलेश पाटील याला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आमदार झालेले पहावयाचे आहे. त्यासाठी त्याने चक्क स्वतःच्या रक्ताने श्री. पडळकर यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी निवेदन दिले आहे. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या शब्दाला मान देऊन श्री. पडळकर यांनी बारामतीतून विधासभा निवडणूक लढवली. पराभूत होणार आहे हे माहीत असूनही फडणवीसांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली.त्यामुळे गोपीचंद पडळकरांना आमदार करून त्यांना न्याय मिळावा अशी विनंती निवेदनात केली आहे.

राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकत नाही-देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Government Formation

नवमहाराष्ट्र वेब टीम : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असतील तरी सत्ता स्थापनेसाठी अनेक पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरुन भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत नवी सत्ता समीकरणं तयार करण्यास सुरुवात केली आहे. असं असलं तरी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात भाजपशिवाय इतर कुणाची सत्ताच येऊ शकत नाही (Devendra Fadnavis on Government Formation), असा दावा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या बैठकीत आमदारांना भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फडणवीस म्हणाले, “राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही. मुंबईत येऊ नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जा. लोकांमध्ये जाऊन भाजपचेच सरकार येणार असल्याचं ठासून सांगा. जेव्हा सरकार येणार असेल तेव्हा मुंबईत बोलावू.”

सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलावू. तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विशेष म्हणजे यावेळी फडणवीसांनी शिवसेनेचा उल्लेख करणेही टाळले.

‘तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून’

आशिष शेलार यांनी बैठकीची अधिकृत माहिती देताना आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इतर पक्षातील चर्चांसोबतच सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहे.”

राज्यभरात 90 हजार बुथवर पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. उद्यापासून (15 नोव्हेंबर) ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून (16 नोव्हेंबर) शहरी भागातील आमदार, परिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहे, अशीही माहिती आशिष शेलार यांनी दिली.

भाजप कोअर कमिटीची आज बैठक

Getty Images

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात सुरू असलेला सत्तास्थापनेचा खेळ आता अंतिम टप्प्यात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली असून सत्ता स्थापन करायची असेल तर होकार कळवा, असा संदेश पाठवला. यानंतर भाजप कोअर कमिटीने रविवारी बैठक बोलावली आहे. यात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्याने महायुती सत्ता स्थापन करू शकली नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होते की काय, अशी स्थिती होती. ही बाब लक्षात घेऊन राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तास्थापनेबाबत विचारणा केली आहे.

  • सर्वात मोठा पक्ष असल्याने भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी बोलावले

२०१४ मध्ये भाजप मोठा पक्ष ठरल्याने त्यांनी स्वत: सत्तास्थापनेचा दावा केला होता. आवाजी मतदानाने बहुमतही सिद्ध केले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली. या वेळी अल्पमतातील सरकार स्थापन करायचे नाही व फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही, असा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिवसेना आमदार हॉटेलमध्ये

राज्यपालांनी भाजपकडे सत्तास्थापनेबाबत विचारणा केल्याचे वृत्त येताच शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे मढ येथील हॉटेल रिट्रिटमध्ये ठेवलेल्या शिवसेना आमदारांची भेट घेण्यास रवाना झाले.

काँग्रेसच्या ३५ आमदारांची जयपुरला रवानगी : काँग्रेसचे ८ आमदार गुरुवारी जयपुरात होते. ती संख्या आता ३५ झाली. सोनिया गांधी यांच्या भेटीला दिल्लीला गेलेला आमदारांचा एक गट शनिवारी येथे पोहोचला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही जाणार असल्याचे समजते.

भाजपचा शेवटचा प्रवास सुरु झाला – छगन भुजबळ

देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लक्षात घेता भाजपचा शेवटचा प्रवास सुरू झाला असून आम्हाला अच्छे दिन नको तर हमारे दिन हवे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला.

छगन भुजबळ हे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, २०१४ च्या निवडणुका भाजपने विकास या शब्दाला घेऊन लढवल्या आणि जिंकल्या. मात्र साडे चार वर्षात विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे जनतेने भाजपला पाच राज्यात नाकारले आहे.

भाजपला २०१९ च्या निवडणुकीत देखील याच परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले तर हनुमनाची जात कुठली हे सुद्धा ते सांगायला लागले अशा शब्दात भाजपच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाण साधला. गेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीतून अनेकजण भाजप मध्ये गेले आता पुन्हा ते घरवापसी करतील का या प्रश्नावर ते म्हणाले की, जे पक्ष सोडून गेले त्यांचा भ्रमनिरास झाला असेल तर त्यांनी परत यायला हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी नवमहाराष्ट्रचे मोबाईल अँप डाऊनलोड करा.