सांगली: कडेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस (वय ५४, रा. कडेगाव, जि. सांगली) (Vipin Hasabnis) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात मदत करण्याची बतावणी करून हसबनीस यांनी वारंवार बलात्कार केल्याची तक्रार २८ वर्षीय पीडित तरुणीने शुक्रवारी कडेगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास इस्लामपूरचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्याकडे सोपवला आहे.
कडेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, निरीक्षक विपिन हसबनीस हे वर्षभरापूर्वीच कडेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले आहेत. लॉकडाउनच्या काळात कारने कोल्हापुरातून कराडच्या दिशेने जाताना त्यांना कासेगाव बस स्थानकाजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत असलेली तरूणी दिसली. हसबनीस यांनी तरुणीला कराडपर्यंत लिफ्ट दिली. प्रवासादरम्यान तिचा मोबाइल नंबर घेतला. ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने तिला अभ्यासात मदत करतो अशी बतावणी केली. यानंतर वारंवार फोन करून कडेगाव येथील घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याचा उल्लेख पीडित तरुणीने फिर्यादीत केला आहे. हा प्रकार एप्रिल ते जुलै दरम्यान घडला. याबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकीही हसबनीस याने पीडितेला दिली होती. अखेर पीडित तरुणीने शुक्रवारी सकाळी कडेगाव पोलीस ठाण्यात निरीक्षक हसबनीस यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.
Tag: karad
11 लाख शेतकरी खातेदारांसाठी खरीप हंगामास 8 हजार कोटीची शासनाची हमी
राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
11 लाख शेतकरी खातेदारांसाठी खरीप हंगामास 8 हजार कोटीची शासनाची हमी
– सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.
यामध्ये राज्य सहकारी बँकेच्यावतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यातमध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. जवळजवळ साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
00000
कराड येथे आढळले 8 कोरोना पॉझिटिव्ह
कराड येथे आढळले 8 पॉझिटिव्ह;
सहा आरोग्य कर्मचारी, एक गरोदर माता व एक निकट सहवासित

सातारा : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 42 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 52 कोविड-19 बाधित रुग्णआढळले आहेत.