महावितरणची वीजबिल वसुली ग्रामपंचायतींकडे !

Navmaharashtra News

वीज थकबाकीच्या मुद्दय़ासह उद्योगांसाठी स्वस्त वीज पुरविण्याबाबत नवीन ऊर्जा धोरणही तयार करण्यात येणार आहे.

महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीज देयक वसुलीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून, ग्रामीण भागात देयक वसुलीचे काम प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात येणार आहे. कृषीपंपांचे थकलेले वीज देयक वसूल करण्यासाठी ऊर्जामित्रांमार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृषी वीज थकबाकीच्या मुद्दय़ासह उद्योगांसाठी स्वस्त वीज पुरविण्याबाबत नवीन ऊर्जा धोरणही तयार करण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वीज देयक वसुलीसाठी खासगी कंपन्यांशी करार करून नियुक्ती केली जाते. त्या धर्तीवर राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये प्रत्येकी एका ग्रामपंचायतीकडे प्रायोगिक तत्त्वावर हे काम देण्याच्या सूचना राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.